Bulldozers demolish illegal chawls in Titwala as KDMC takes action, leaving hundreds of families homeless amid rising anger. saam tv
मुंबई/पुणे

लोकांच्या स्वप्नांशी खेळ! सरकारी जागेत घरं बांधायचा, नंतर अतिक्रमण म्हणून बुलडोझर चालवायचा; कल्याणमधील मोठं रॅकेट उघड

Housing Scam In Kalyan Titwala Area: कल्याण-टिटवाळा परिसरात अनधिकृत चाळींवर केडीएमसीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. चाळ माफिया आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताचा आरोप केला जात असून शेकडो कुटुंबे बेघर झाली आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील टिटवाळा परिसरात अनधिकृत चाळींवर अखेर महापालिकेने बुलडोजर चालवत तोडक कारवाई सुरू केली आहे. बल्याणी आणि मांडा परिसरात शासनाच्या जागांवर चाळमाफियांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. स्वस्त घरांचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांना ही घरे विकण्यात आली. मात्र आता या बांधकामांवर कारवाई सुरू झाल्याने शेकडो कुटुंबे बेघर झाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, चाळमाफिया आणि महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतातून हे संपूर्ण रॅकेट सुरू आहे. आधी अनधिकृत चाळी उभारल्या जातात, त्यानंतर त्या सर्वसामान्यांना विकल्या जातात आणि काही वर्षांनी त्यांच्यावर तोडक कारवाई केली जाते. त्यामुळे घरासाठी आयुष्यभराची पुंजी गुंतवणारे नागरिक भरडले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

केडीएमसीकडून सुरू करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने ही कारवाई नियमानुसार सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनधिकृत बांधकामे सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले, याची चौकशी करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'देऊळ बंद २' चित्रपटातील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे फोटो पाहिलेत का? दिसतेय खूपच सुंदर!

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला 28 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम

Anupriya Goenka: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्यानं खळबळ; वेश्याव्यवसायाला म्हटलं 'सोशल सर्व्हिस'

Safety Tips : कारने डोंगराळ भागात फिरायला जाताय? या ७ गोष्टी कायम लक्षात ठेवा, अन्यथा...

Mumbai Rain Alert : वातावरण बदललं! मुंबईत पुढील काही तासांत धो धो पाऊस कोसळणार, IMD कडून अलर्ट

SCROLL FOR NEXT