Kalyan News Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan News: मैदान स्वच्छ करा, अन्यथा कचरा अधिकाऱ्यांच्या दालनात टाकू; सुभाष मैदानाच्या दुरवस्थेबाबत मनसे आक्रमक

Kalyan Subhash Maidan: सुभाष मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर ड्रेनेजचे पाणी येते, मैदानात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे, स्वच्छतागृहाची दुरवस्था आहे, महिलांसाठी चेंजिंग रूम नाही. त्यामुळे मैदानात खेळण्यास येणाऱ्या खेळाडूंना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

Ruchika Jadhav

कल्याण अभिजित देशमुख

Kalyan News:

कल्याणमधील सुभाष मैदानाच्या दुरवस्थेबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. आज दुरवस्थेबाबत या मैदानात सह्यांची मोहीम राबवत मनसेने पालिका अधिकाऱ्यांना मैदानाच्या दुरावस्थेचे फोटो भेट दिलेत. मैदानाच्या दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत येत्या आठ दिवसात मैदान सुस्थितीत करा अन्यथा मैदानातील कचरा घाण अधिकाऱ्यांच्या दालनात टाकू असा इशारा मनसेने दिलाय.

कल्याणमधील सुभाष मैदानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालीय. सुभाष मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर ड्रेनेजचे पाणी येते,मैदानात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे, स्वच्छतागृहाची दुरवस्था आहे, महिलांसाठी चेंजिंग रूम नाही. त्यामुळे मैदानात खेळण्यास येणाऱ्या खेळाडूंना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

खेळाडूंनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय. याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. आज मनसेचे माजी आमदार व शहर अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे अधिकारी संजय जाधव यांची भेट घेत मैदानाच्या दुरावस्थेबाबत त्यांना जाब विचारला.

महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मैदानाची ही अवस्था तर इतर मैदानाचं काय? असा सवाल त्यांनी केलाय. यावेळी मैदानाच्या दुरावस्थेचे फोटो अधिकाऱ्यांना भेट देण्यात आलेत. तसेच मैदान सुस्थितीत करण्यासाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिलाय. ८ दिवसांत मैदानाचे काम पूर्ण करावे अन्यथा मैदानातील घाण कचरा अधिकाऱ्यांच्या दालनात टाकू असा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT