kalyan crime Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: पूर्ववैमनस्यातून मित्रांवर गोळीबार; कल्याण क्राईम ब्रँचनं आरोपीला २४ तासात ठोकल्या बेड्या

Bharat Jadhav

Kalyan Crime:

कल्याणच्या मोहने परिसरात गोळीबार करणाऱ्या आरोपीला कल्याण गुन्हे शाखेनं अवघ्या २४ तासात अटक केलीय. काल कल्याणच्या मोहने परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारात सुशील मोहंतो हा तरुण या जखमी झाला होता. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला होता. परंतु गुन्हे शाखेनं अवघ्या २४ तासात उमेश खानविलकर या आरोपीला बेड्या ठोकल्यात. (Latest Crime News)

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश आणि सुशील यांच्यात आधीपासून वाद होता. काल हे दोघे आपल्या काही मित्रांसह दारू पार्टी करत होते. यावेळी जुन्या वादातून उमेशने गोळीबार केला होता. कल्याण जवळ असलेल्या मोहने परिसरातील एका घरात सुशील मोहंतो आणि उमेश खानविलकर हे आपल्या मित्रासोबत मद्य पार्टी करत होते. सुशील आणि उमेश मध्ये जुना वाद होता. या पूर्ववैमनस्यातून उमेशनं सुशीलवर गोळ्या झाडल्या.

सुशीलने बचावासाठी हात पुढे केला असता गोळी त्याचा हात फाडून त्याच्या तोंडात गेली. जखमी झालेल्या सुशीलला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. गोळीबारानंतर उमेश पसार झाला होता. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण क्राईम ब्रँचदेखील या आरोपीचा शोध घेत होते.

उमेश शहाड परिसरात लपून बसला असून तो तेथून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरात सापळा रचत उमेशला अटक केली. दरम्यान उमेशने बंदूक कुठून आणली याचा तपास खडकपाडा पोलीस करत आहेत .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंतराळात दिसली रहस्यमयी वस्तू; शास्त्रज्ञंही झाले हैराण

Marathi News Live Updates : अजित पवारांचे कट्टर समर्थक मोहोळचे माजी आमदार राजन पाटील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला

Akshay Shinde : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला आठवडा झाला, पण स्मशानभूमीत दफनविधीसाठी कुणी जागाच देईना

Sharad Pawar: इंदापुरात वारं फिरलं! हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेणार का? शरद पवार कार्यकर्त्यांना म्हणाले...

Vastu Tips: दिशेनुसार घरात लावा 'या' रंगाचा पडदा; होईल धन-धान्यांची भरभराट

SCROLL FOR NEXT