Builder Threatened in Kalyan Saam
मुंबई/पुणे

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Builder Threatened in Kalyan: शिंदे गटाच्या युवा उपशहर प्रमुख वैभव पाटीलसह ७ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल, घटनेचे सीसीटीव्ही समोर.

Bhagyashree Kamble

  • वडवली परिसरातून राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी

  • खंडणी मागितल्याप्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

  • शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाच्या अडचणीत वाढ

संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधून राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवकांचा मुलगा वैभव पाटील याच्यासह सात जणांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडवली परिसरात बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

बांधकाम व्यावसायिक मंगेश दशरथ गायकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे मंगेश स्टार, मंगेशी हेवन आणि मंगेशी जेमिनी हे प्रकल्प वडवली परिसरात सुरू आहेत. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३३ वाजता वैभव दुर्योधन पाटील आणि सुनिल राजाराम पाटील यांच्यासह पंकज पाटील, उद्धव पाटील, तेजस पाटील, ध्रुव पाटील आणि करण पाटील असे एकूण सात आरोपी बेकायदेशीररित्या बांधकाम साइटवर आले.

तक्रारीनुसार आरोपींनी कामगार, कंत्राटदार आणि ऑफिस स्टाफला शिवीगाळ केली. काम बंद पाडले. 'हा एरिया आमचा आहे. माल आमच्याकडून घ्यावा लागेल, नाही घेतल्यास प्रत्येक गाडीमागे ३,००० रुपये द्यावे लागतील', अशी खंडणीची मागणी केली. तसेच 'आम्ही सांगत नाही तोपर्यंत साइट चालू करायची नाही, नाहीतर जीवे ठार मारीन', अशी धमकी दिल्याचा आरोपही गायकर यांनी केला आहे.

याआधीही दोन वेळा अशाच प्रकारे धमक्या देण्यात आल्या असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. अखेर वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. कामासाठी तांत्रिक कौशल्य असलेल्या कामगारांची आवश्यकता असते आणि सर्व स्थानिकांना काम देणे शक्य नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, आरोपी वैभव पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून ते म्हणाले, 'मी कोणताही हप्ता मागितलेला नाही. यासंदर्भात पुरावे असतील तर ते दाखवावेत. मी फक्त स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी व्यावसायिकांशी दोन वेळा बैठक घेतली होती', असं वैभव पाटील म्हणालेत.

तसेच त्यांनी गुन्ह्याच्या वेळेबाबत शंका व्यक्त करत म्हटले, '२० दिवसांनंतर गुन्हा दाखल करणे संशयास्पद आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी डाव रचत व्यावसायिकाला हाताशी धरून खोटा गुन्हा दाखल केला आहे', असा संशय त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे वडवली परिसरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics : बिहारच्या विजयानंतर भाजपची मोठी कारवाई; आमदार, माजी केंद्रीय मंत्र्यांसहित तिघे पक्षातून निलंबित

Famous Artist Death: थराररक! 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या प्रसिद्ध आर्टिस्टचा २९ व्या वर्षी मृत्यू; सिंहाने जबडा खाल्ला

Maharashtra Politics: परिवाराचा नाही तर..., बिहार निकालानंतर राज्याचं राजकारण तापलं; मुंबईमध्ये बॅनर वाॅर|VIDEO

Maharashtra Live News Update: मनमाड बायपासवर गावकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन अखेर मागे

Winter Health Tips: हिवाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नये?

SCROLL FOR NEXT