Kalyan - Shilphata Road Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan-Shilphata Road: कल्याण-शिळफाटा रोड ५ दिवस बंद; कुठून कराल प्रवास, पर्यायी मार्ग कोणता?

Kalyan-Shilphata Road Closure: ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीच्या काळात कल्याण - शीळ रोड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Priya More

अभिजीत देशमुख, कल्याण

कल्याण आणि डोंबिवलीमधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. कल्याण शीळ रोडवरील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीच्या काळात कल्याण - शीळ रोडवर जड- अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वाहतुककोंडी टाळण्यासाठी हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

कल्याण - शिळ मार्गावरील पलावा येथील रेल्वेवरील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम येत्या ५ ते १० फेब्रुवारी दरम्यान केले जाणार आहे. त्यामुळे या काळात पलावा जंक्शनकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या कालावधीत या मार्गावरून जाणाऱ्या हलक्या वाहनांना विरुद्ध दिशेकडील रस्त्याने जाता ये.ईल मात्र जड आणि अवजड वाहनांना कल्याण - शीळ रोडवर या काळात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी खोणी तळोजा मार्गाचा तसेच डोंबिवली मोठागाव मानकोली पुलाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

कल्याण -शिळ मार्गावरील एकस्पिरीया मॉलजवळील पलावा जंक्शनकडे जाणाऱ्या दिशेने रेल्वेच्या अखत्यारीतील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम डेडिकेटेड फ्रेट कोरिडोर प्रकल्पाअंतर्गत ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान केले जाणार आहे. यामुळे ही मार्गिका वाहतुकीसाठी ५ फेब्रुवारी रात्री १२ वाजता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. दरम्यान या काळात छोट्या वाहनानी ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी डोंबिवलीतील मोठागाव माणकोली पुलाचा वापर करावा तसेच नवी मुंबईकडे जाण्यासाठी वाहनचालकांनी काटाई जंक्शनवरून पाईप लाईन मार्गे एमआयडीसी तळोजा मार्गाचा वापर करावा.

तर हलक्या वाहनाना विरुद्ध दिशेची मार्गिका वापरता येणार आहे. हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या वाहनांनी कटाई नाका - कटाई गाव कमान मार्गे विरुद्ध वाहिनीवरून पुढे जाऊन पुढे पलावा जंक्शन येथे नियमित वाहिनीवरून प्रवास करावा तर या काळात जड आणि अवजड वाहनांना कल्याण शिळ मार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली असून वाहनचालकांनी वाहतुकीच्या अधिसूचनेचे पालन करत सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT