Kalyan Latest News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : कल्याणमध्ये चाललंय काय? हॉर्न वाजवण्यावरून राडा; टेम्पो चालकाकडून रिक्षाचालकाला लोखंडी रॉडने मारहाण

Kalyan Latest News : कल्याणमध्ये हॉर्न वाजवण्यावरून जोरदार राडा झाला. भर रस्त्यात टेम्पो चालकाने लोखंडी रॉडेने मारहाण केली.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण : कल्याणमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कल्याणमधील वाढत्य गुन्ह्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कल्याणमध्ये मद्यधुंद चालकाने ५-६ वाहनांना उडवल्याची घटना ताजी असताना भर रस्त्यात हाणामारीची घटना घडली. भर रस्त्यात हॉर्न वाजवण्यावरून रिक्षा चाकाने टेम्पोचालकाला जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन हाणामारीत रुपांतर झालं. या वादात टेम्पो चालकाने टेम्पो चालकाला बेदम मारहाण केली.

हॉर्न वाजवण्यावरून रिक्षा चालक आणि टेम्पो चालकामध्ये वाद झाला. याच वादातून टेम्पो चालकाने रिक्षा चालकाला लोखंडी रोड आणि लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. कल्याणच्या नेतेवली परिसरात ही घटना घडली. या मारहाणीत रिक्षा चालक समीर शेख जखमी झाला आहे. तर या मारहाणीनंतर टेम्पो चालक पसार झाला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाने तक्रार नोंदवली आहे. फरार झालेल्या टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण पूर्व नेतिवली परिसरात राहणारे समीर शेख हे रिक्षा चालवतात. समीर शेख नेहमीप्रमाणे आज सकाळी ते रिक्षा घेऊन जात होते. त्यांच्या रिक्षा मागून एक टेम्पो भरधाव वेगाने येत होता. तसेच रिक्षाच्या बाजूने एक दुचाकीस्वार महिला जात असल्याने समीर शेख यांनी आपली रिक्षाचा वेग कमी केला. त्याच दरम्यान टेम्पो चालकाने जोरजोरात हॉर्न वाजायला सुरुवात केली.

समीर यांनी टेम्पो चालकाला विचारलं की हॉर्न का वाजवतो? तेव्हा टेम्पो चालक आणि त्याच्या साथीदाराने त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. इतकंच नाही. तर त्यांनी टेम्पोमधून लोखंडी रोड आणि बांबू काढून समीर यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत समीर शेख रक्तबंबाळ झाले. या घटनेनंतर टेम्पो चालक आणि त्याचा साथीदार दोघेही पसार झाले. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

Thane Tourism : मुंबईजवळचं ठाणे पावसाळ्यात होते स्वर्गाहून सुंदर, वीकेंडला नक्की फिरा 'ही' ठिकाणे

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Delhi : CNG पंपावर मोठा स्फोट, तिघांचा मृत्यू; गॅस भरताना टाकी फुटल्यानं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT