RPF JAWAN ATTACKED AT KALYAN RAILWAY STATION THREE ACCUSED ARRESTED Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याण हादरलं! तिघांकडून RPF जवानावर हल्ला, घटनेने रेल्वे स्थानकात गोंधळ

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानावर तिघांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना. आरोपी अटकेत असून प्रकरणाचा तपास सुरू. सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह.

Alisha Khedekar

  • कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानावर तिघांचा हल्ला

  • प्रवाशांमधील भांडण सोडवताना घटना घडली

  • तिघे आरोपी अटकेत, न्यायालयीन कोठडी सुनावली

  • रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानावर तिघांनी हल्ला करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी कल्याण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादर-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला काही जण मारहाण करत असल्याची माहिती आरपीएफचे जवान नरेंद्र यादव यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ त्या डब्याकडे धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी संबंधित तिघांना खाली उतरून चौकशीसाठी प्लॅटफॉर्मवर येण्यास सांगितले.

मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उतरल्यावर या तिघांनी अचानक आरपीएफ जवान नरेंद्र यादव यांच्यावरच हल्ला चढवला. तिघांनी मिळून त्यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार पाहून प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अब्दुल शेख, सलमान शेख आणि सरकार शेख अशी आहेत.

पोलिसांनी तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत आधारवाडी कारागृहात रवानगी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण जीआरपी पोलिसांकडून सुरू असून, हल्ल्याचे नेमके कारण काय होते याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्तव्य बजावत असलेल्या सुरक्षारक्षकांवरच हल्ले होत असल्याने सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अमरावतीत तलवार घेऊन दहशत माजवणारा आरोपी अटकेत; राजापेठ पोलिसांची कारवाई

Heart blockage symptoms: ही 5 लक्षणं दिसली तर समजा की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात; हार्ट अटॅक येण्यापूर्वी लक्ष द्या

Mumbai Tourism : किल्ल्यासारखं दिसणारं गणपतीचं मंदिर, मुंबईजवळच आहे 'हे' खास लोकेशन

EPFO New Rule 2026 : मोठी बातमी! ₹25,000 EPFO मर्यादा लागू; तुमचा पगार कमी होणार?

Cardamom Benefits: पचनक्रिया सुधारण्यापासून तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापर्यंत; रोज १ वेलची खाण्याचे ७ फायदे

SCROLL FOR NEXT