kalyan  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : रेल्वे प्रवाशांनो सावधान! स्टेशन परिसरात फटका गँग पुन्हा सक्रिय; एकाच्या हातावर फाटका मारला अन्...

kalyan crime news : लोकल आणि एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांना सावधान राहण्याची गरज आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा एकदा फटका गँग सक्रिय झाली आहे.

Vishal Gangurde

अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या हातावर मारला फाटका

हातावर फटका मारून चोरला मोबाईल

चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

मध्य रेल्वेच्या कल्याण भागात पुन्हा फटका गँग सक्रिय झाली आहे. मध्य रेल्वेवरील शहाड ते आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या अमरावती एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या हातावर बांबूने फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेला मोबाईलही हस्तगत करण्यात आलाय.

काही दिवसांपूर्वी अमरावती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या हातावर बांबूने फटका मारून त्याचा मोबाईल खाली पाडण्यात आला होता. मोबाईल पडताच आरोपीने लंपास केला होता. या प्रकरणी पीडित प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील माहिती गोळा करून तपास सुरू केला. आरोपी पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हसन दारा जफर या फटका गँगच्या सदस्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीकडून पीडित व्यक्तीचा चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आलाय. तसेच आरोपीने यापूर्वी अशाच पद्धतीने आणखी किती मोबाईल चोरी केले आहेत, याबाबतही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या तपासातून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोहमार्ग पोलीस पथकाने केली आहे. आरोपीकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांना पोषण आणि शाईन पाहिजे? मग ट्राय करा 'हा' घरी तयार केलेला हेअर मास्क

अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचाही घातपात होऊ शकतो; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा|VIDEO

Maharashtra News Live Update : परळीच्या मिरवट गावात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग

अतिरिक्त आयुक्तांनी अधिकाऱ्याला फटकारलं; भर मिटिंगमध्येच उपायुक्तांना आला हृदयविकाराचा झटका

लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹२००० मिळणार; मुंबई महापालिकेने आखला मास्टर प्लान

SCROLL FOR NEXT