Kalyan Police officials conduct student safety and school transport awareness session at KC Gandhi School Saam Tv
मुंबई/पुणे

बदलापूर घटनेनंतर कल्याण पोलिसांची मोठी पावले; शालेय सुरक्षेला प्राधान्य

Student Safety Awareness Program In Kalyan Schools: बदलापूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस परिमंडळ ३ कडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण: बदलापूर मध्ये विद्यार्थ्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटना कल्याणात घडू नये यासाठी कल्याणचे पोलीस परिमंडळ ३ हे सज्ज झालेले पाहायला मिळाले आहे . याच पार्श्वभूमीवर कल्याणात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ठाणे पोलीस आयुक्तालय परिमंडळ ३ कल्याण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने विशेष विद्यार्थी सुरक्षा व उपयोजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. कल्याण येथील केसी गांधी शाळा येथे पार पडलेल्या या शिबिराला शाळांचे प्रतिनिधी, बस मालक व चालक, आरटीओ अधिकारी, वाहतूक पोलीस तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या शिबिरात डीसीपी अतुल झेंडे, एसीपी कल्याणजी घेटे, केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा शाळेकडे आणि शाळेतून घरी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक नियम, खबरदारी आणि कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्कूल बसची तांत्रिक तपासणी, चालकांचे वैध परवाने, वेगमर्यादा पाळणे, बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशामक उपकरणे, महिला सुरक्षा उपाययोजना आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.

डीसीपी अतुल झेंडे यांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करत, विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शाळा प्रशासन, पालक, बस मालक आणि चालक यांनी नियमांचे पालन केल्यास अपघात आणि अनुचित घटना टाळता येतील असे स्पष्ट केले. नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या मार्गदर्शन शिबिरामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक सकारात्मक पाऊल उचलले गेले असून, भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपयुक्त अतुल झेंडे यांच्या कडून देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT