Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

Sakshi Sunil Jadhav

टोमॅटोचा वापर

स्वयंपाक घरात टोमॅटो असतातच. भाजी, आमटी, रस्सा, बिर्याणी किंवा डाळीमध्ये चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. पण बाजारात गावठी आणि हायब्रिड असे दोन प्रकारचे टोमॅटो मिळतात असतात. हे जाणून घेऊया.

Hybrid Tomato

गावठी आणि हायब्रिड टोमॅटो

गावठी टोमॅटो हा पारंपरिक भारतीय जातीचा असतो. त्याची चव नैसर्गिक असते. हायब्रिड टोमॅटो वेगवगळ्या जातींच्या संकरातून तयार केला जातो.

Tomato Identification

आकारावरून ओळखा फरक

हायब्रिड टोमॅटो हा साधारणपणे लांबट आकाराचा असतो. तर गावठी टोमॅटो हा गोल आणि नैसर्गिक आकाराचा दिसतो.

Tomato Nutrition

चव आणि सुगंध

गावठी टोमॅटो जास्त आंबट आणि सुगंधी असतात. हायब्रिड टोमॅटोची चव जरा सौम्य आणि कमी सुगंधाची अशी असते.

Healthy Cooking Tips

सालीची जाडी वेगळी असते

हायब्रिड टोमॅटोचे साल आणि जरा जाडसर असते. गावठी टोमॅटोचं साल पातळ असतं त्यामध्ये पाणी जास्त असतं.

Tomato Buying Guide

ताजा राहणारा टोमॅटो

हायब्रिड टोमॅटो जास्त दिवस ताजे राहतात. पण गावठी टोमॅटो हे लवकर मऊ होऊन खराब होण्याची शक्यता असते.

Tomato Buying Guide

कोणत्या पदार्थांसाठी कोणता टोमॅटो?

चटणी, रस्सा, आमटी आणि करी करण्यासाठी गावठी टोमॅटो उत्तम मानला जातो. तर सलाड आणि सजावटीसाठी हायब्रिड टोमॅटोचा वापर जास्त केला जातो.

Tomato Buying Guide

हायब्रिड टोमॅटो

हायब्रिड टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन C, पोटॅशियम, फोलेट आणि लाइकोपीनसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी सुरक्षित मानले जातात.

Tomato Buying Guide

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tomato Buying Guide

NEXT : सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

indigestion relief
येथे क्लिक करा