Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

Sakshi Sunil Jadhav

कपालभाती म्हणजे काय?

कपालभाती हा एक सोपा व्यायामाचा प्रकार आहे. यात श्वास वेगाने बाहेर सोडला जातो आणि श्वास नैसर्गिकरित्या घेतो. त्याची पद्धत आणि फायदे जाणून घेऊयात.

acidity relief

योग्य आसनात बसा

पद्मासन, सुखासन किंवा वज्रासनात पाठीचा कणा सरळ ठेवून आरामदायी स्थितीत बसा.

kapalbhati pranayama

श्वास बाहेर सोडा

पोट आत ओढत नाकाने जोरात श्वास बाहेर सोडा. श्वास आत घेण्याचा प्रयत्न करू नका.

yoga for acidity

हळूहळू सराव करा

तुम्ही पहिल्यांदा हा व्यायाम करत असाल तर हळूहळू सुरुवात करून श्वासोच्छ्वासाची संख्या वाढवा.

digestive health

पोटाचे स्नायूंना होणारा फायदा

कपालभातीमुळे पोटावरील स्नायूंना व्यायाम मिळतो आणि त्यांची ताकद वाढण्यास मदत होते.

indigestion relief

ऑक्सिजनचे प्रमाण

कपालभातीमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारून शरीराला जास्त ऑक्सिजन मिळते.

stomach health

पचनक्रिया सुधारते

नियमित कपालभाती केल्यावर पचनसंस्था सक्रिय राहते आणि अपचनाच्या समस्या कमी होतात.

indigestion relief

मानसिक तणाव कमी होतो

कपालभाती हा प्राणायाम मन शांत ठेवण्यास मदत करतो आणि तणाव तसेच चिंता कमी करण्यास फायदेशीर ठरतो.

indigestion relief

टीप

उच्च रक्तदाब, हृदयविकार, गर्भधारणा किंवा गंभीर आरोग्य समस्या असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कपालभाती करावा.

indigestion relief

NEXT: जोडीदार साथ देणार, ५ राशींच्या व्यक्तीचा यशाचा मार्ग खुला होणार; वा चा रविवारचे राशीभविष्य

google
येथे क्लिक करा