Kalyan crime news  Saam tv
मुंबई/पुणे

गेमझोनच्या नावाखाली चालायचे भलतेच प्रकार; प्रायव्हेट रुममधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Kalyan crime news : गेमझोनच्या नावाखाली अश्लील चाळे सुरु असल्याचे पोलिसांच्या धाडीत समोर आलं आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी ही माहिती दिली.

Saam TV News

गेमझोनवर कोळसेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली

या गेमझोनमध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश दिल्याची गंभीर माहिती समोर आलीये

उपायुक्त अतुल झेंडे यांनी माहिती दिली आहे

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पूर्व येथील चिंचपाडा रोड परिसरातील जॉयस्टीक जंगल या गेमझोनवर कोळसेवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. कोणत्याही सुरक्षात्मक नियमांचे पालन न करता अल्पवयीन मुलांना प्रवेश दिल्याची गंभीर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती कल्याण परिमंडळ–३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश न्हायदे, सहायक पोलीस निरीक्ष दर्शन पाटील यांच्यासह पथकाने गेमझोनवर अचानक छापा टाकला. तपासात गाळ्यात १८ वर्षांखालील मुलं–मुली ८ संगणकांवर ऑनलाइन गेम खेळत असल्याचे आढळले.याशिवाय गेमझोनमध्ये गंभीर सुरक्षादोष असल्याचेही स्पष्ट झाले.

एका बंदिस्त प्रायव्हेट रूममध्ये अल्पवयीन मुलं अश्लील चाळे करत असल्याचे समोर आले आहे. या प्रायव्हेट रूममध्ये लाईट प्रकाश यंत्रणा आणि व्हेंटिलेशनची कोणतीही सुविधा नव्हती. फायर सेफ्टी उपकरणांचा अभाव असल्याची गोष्ट देखील या ठिकाणी समोर आली आहे. नको ते प्रकार या ठिकाणी सुरू असल्याने यात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आलेले नव्हते, असे पोलिसांच्या निदर्शनात आले. अशा परिस्थितीत मुलांना प्रवेश दिल्याने मोठ्या दुर्घटनेची होण्याची दाट शक्यता आहे.

या प्रकरणी गेमझोनचे मालक पृथ्वीराज राजा चव्हाण (27), श्रीराम राजा चव्हाण (25) आणि चालक अमित उदाराम सोनवणे (20) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास कोळसेवाडी पोलिसांकडून सुरू आहे.उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, शर्ती व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व गेमझोन्सवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे, अशा ठिकाणी ते जात नाहीत याची खात्री करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case: अंगावर जखमा, तोंडात मोजा कोंबला; चिमुरडीच्या पोस्ट मॉर्टममधून धक्कादायक माहिती उघड

Malshej Ghat : माळशेज घाटाजवळ एसटी बसचा भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

Maharashtra News Live Update : पंढरपूरच्या कॉरिडॉरला मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीची मान्यता

Wedding Market News: ऐकावं ते नवलच! येथे भरतो चक्क 'नवरा-नवरीचा' बाजार; भिंतीवरचे कागद वाचून ठरतात लग्न!

World Asthma Day: वायू प्रदूषणाचा फुफ्फुसांवर कसा परिणाम होतो? थॅलेसेमिया रुग्णांसाठी महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT