uddhav thackeray and shrikant shinde  saam tv
मुंबई/पुणे

Shrikant Shinde: ...म्हणून ग्रामपंचायत निवडणूकित लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली, श्रीकांत शिंदेची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Shrikant Shinde On Uddhav Thackeray: ...म्हणून ग्रामपंचायत निवडणूकित लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली, श्रीकांत शिंदेची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Shrikant Shinde On Uddhav Thackeray:

''2019 मध्ये स्वतःसाठी लोकांचा विश्वासघात केला. त्याचा बदला म्हणून ग्रामपंचायत निवडणूकित लोकांनी तुमची जागा दाखवली'', असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. ग्रामपंचायत निवडणूक निकालात यांचा अपक्षांपेक्षाही मागे लागला असून यांचा सातव्या नंबर म्हणजे शेवटून पहिला नंबर असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते डोंबिवली ग्रामीण भागातील खोनी गाव शिवसेना शाखेचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ असेल किंवा ठाणे जिल्हा असेल आपल्याला निधीची कमतरता नाही. येणाऱ्या महापालिका, ग्रामपंचायत, लोकसभा विधानसभा, निवडणुका जिंकायची असेल तर संघटनात्मक ताकद वाढवावी लागेल, घराघरापर्यंत सरकारचं काम पोहोचवावं लागेल. जोमाने कामाला लागा, घरा घरात शिवसैनिक तयार झाला पाहिजे. शिवसेना पोहोचली पाहिजे, असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले हणेत.  (Latest Marathi News)

ते पुढे म्हणाले की, जनतेचा मुख्यमंत्र्यांवर असलेला विश्वास दिवसेंदिवस वाढत चाललाय. या वाढत्या विश्वासावर शिक्कामोर्तब करण्याचं काम यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून झालंय. काही लोक ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्ष चिन्हावर होत नाहीत, असे म्हणाले. पण जर आमच्या ठिकाणी ते असते तर आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाल्या, असं बोलले असते.

शिंदे म्हणाले, 2019 मध्ये स्वतःसाठी तुम्ही (उद्धव ठाकरे यांनी) लोकांचा विश्वासघात केलात. त्याचा बदला लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये घेतला. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये तुमची जागा लोकांनी दाखवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT