Kalyan Rada News 
मुंबई/पुणे

Kalyan News : दारूसाठी शेजाऱ्याच्या घरात राडा, कुटुंबाला दांडक्याने मारहाण, १९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Kalyan Rada News :दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजाऱ्यांशी वाद केल्याची घटना कल्याण इंदिरा नगर परिसरातील घडली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ,बाप लेकाला अटक.

Namdeo Kumbhar

अभिजित देशमुख, कल्याण प्रतिनिधी

kalyan Crime News Updat : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजाऱ्यांशी वाद घातला. इतकेच नव्हे तर संतापलेल्या बाप लेकाने आपल्या साथीदारांसह दारूचे पैसे न देणाऱ्या इसमासह त्याची पत्नी 19 वर्षीय मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात 19 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. सानिया सय्यद असे मयत मुलीचे नाव आहे. कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्याचे सहकारी शोएब शेख, अजिज शेख, शाहिद शेख या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद हे आपल्या पत्नी व मुलीसह राहतात. निसार सय्यद हे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नुसार घरी जेवत असताना याच परिसरात राहणारा गुलाम शेख हा त्यांच्या घरी आला त्याने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले असता निसार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने या दोघांमध्ये वाद झाला .

याच वादातून गुलाम यांचा मुलगा अब्दुल शेख त्याचा मित्र शोएब शेख अजित शेख व शाहीर शेख यांनी निसार यांच्या घरात घुसून निसार यांना बेदम मारहाण केली. यावेळी निसार यांचे पत्नी झुलेखा व मुलगी सानिया या दोघी निसार याना सोडवण्याकरता आल्या. या दोघींना देखील त्यांनी धक्काबुक्की केली. या दरम्यान अब्दुल याने त्यांचे मुलगी सानिया यांच्या लाकडी दांडक्याने हल्ला केला या हल्ल्यात सानिया हिचा मृत्यू झालाय. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्याचे सहकारी शोएब शेख, अजिज शेख, शाहिद शेख या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीच्या वसमत रोडवर धावत्या ऑटोला आग, काही क्षणात वाहन जळून खाक

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

Plain Saree Styling Tips: प्लेन साडीमध्ये दिसाल एकदम स्टायलिश, या 5 फॅशन टिप्स करा फॉलो

Electricity Bill Mumbai: विज बील होणार स्वस्त, ग्राहकांसाठी नवे दर काय असतील?

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचं तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT