Dombivli Fake Butter Factory  Saam TV
मुंबई/पुणे

Dombivli News: डोंबिवलीतील बटर कारखान्यावर क्राइम ब्रांचचा छापा; झाडझडती घेताच अधिकारीही चक्रावले

Dombivli Crime News: डोंबिवली जवळील खोणी गावात एका निर्माणाधीन इमारतीमध्ये सुरू असलेल्या बटर बनवण्याचा कारखान्यावर अचानक कल्याण क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

Satish Daud

अभिजित देशमुख, साम टीव्ही कल्याण

Dombivli Fake Butter Factory

डोंबिवली जवळील खोणी गावात एका निर्माणाधीन इमारतीमध्ये सुरू असलेल्या बटर बनवण्याचा कारखान्यावर अचानक कल्याण क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी समोर जे दृश्य दिसून आलं, ते पाहून अधिकारीही चक्रावून गेले. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डोंबिवलीजवळील काटई बदलापूररोडवरील खोनी गावाजवळ एका निर्माणाधीन निर्माणाधिन इमारतीमध्ये बनावट बटर बनवले जात असल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रांचचे कर्मचारी दत्ताराम भोसले आणि गुरुनाथ जरग यांना मिळाली होती. (Latest Marathi News)

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल म्हस्के, पोलीस अधिकारी संदीप चव्हाण, पोलीस कर्मचारी दत्ताराम भोसले, गुरुनाथ जरग, अनुप कामत यांच्या पथकाने इमारतीवर अचानक छापा टाकला.

या ठिकाणी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने बटर तयार केले जात असल्याचं अधिकाऱ्याचं निर्देशनात आलं. यावर तातडीने कारवाई करत क्राईम ब्रांचने पिंटू यादव आमि प्रेमचंद फेकूराम या दोन आरोपींना अटक केली. त्याचबरोबर तीन लाखांचा मुद्देमाल देखील जप्त केला.

धक्कादायक बाब म्हणजे, अत्यंत घाणेरड्या पद्धतीने तयार केलेले बनावट बटर एका नामांकित कंपनीच्या बॉक्समध्ये पॅक केले जात होते. तसेच ते शहरातील सँडविच हातगाडी, धाबे, हॉटेल व्यावसायिकांना विकले जात होते. या ठिकाणाहून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध बटर बनवण्याकरता लागणारे साहित्य, मशीन कच्चामाल व नामांकित कंपनीच्या कागदी बॉक्स जप्त केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT