Kalyan Latest News: Saamtv
मुंबई/पुणे

Kalyan News: 'राजकारणातून संन्यास घ्यायचा, नाहीतर संपवून टाकेन...' शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Kalyan Latest News: शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विजया पोटे असे या महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, ता. १० मे २०२४

दोन दिवसातून राजकारण सोडून संन्यास घ्यायचा ,कल्याण सोडून निघून जायचे , नाहीतर संपवून टाकेन अशी धमकी दिल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विजया पोटे असे या महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन दिवसातून राजकारण सोडून संन्यास घ्यायचा ,कल्याण सोडून निघून जायचे , नाहीतर संपवून टाकेन अशी धमकी दिल्याचा आरोप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी असलेल्या विजया पोटे व त्यांचे पती अरविंद पोटे यांनी नुकताच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता.

या पक्षप्रवेशानंतर अरविंद पोटे यांना ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळ हरदास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तर दुसरीकडे याप्रकरणी बाळ हरदास यांनी पोटे यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, खोटे आहेत, मी कुणालाही धमकी दिली नाही धमकी देण्याचा त्यांचा काम आहे असे स्पष्टीकरण दिले आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : मुंबईत २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, २ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन महिन्यांत स्वाईन फ्लूचे ६२६ रुग्ण

RBI Repo Rate Hike: होम लोन घेणाऱ्यांचे टेन्शन वाढलं, EMI वाढण्याची शक्यता; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Weight Loss : वजन घटवायचं असेल तर रात्री 'या' ५ पदार्थांना करा बाय-बाय, आठवड्याभरात दिसेल फरक

BP Medicines: BP नॉर्मल आला म्हणून गोळी बंद केली? ठरू शकतं महागात; डॉक्टरांनी सांगितलं हार्ट अटॅकचा धोका वाढतो

SCROLL FOR NEXT