kalyan News Saam tv
मुंबई/पुणे

kalyan: तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, गर्लफ्रेंडला वाटलं बॉयफ्रेंडनेच उडी मारली; तरुणीने पाठोपाठ त्याच तलावात झोकून दिलं

kalyan Latest News: उडी मारणाऱ्या तरुणीला प्रियकराने तलावात उडी मारली, असा गैरसमज झाला. त्यानंतर या गैरसमजातून तिने तलावात उडी घेतली होती. काही वेळाने तिचा प्रियकर देखील तिच्या समोर आल्याने तिचा गैरसमज दूर झाला.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

kalyan News:

'तलावात एका व्यक्तीने उडी घेतली', हे ऐकून एका तरुणीने तलावात उडी मारली. मात्र या तरुणीला शुभम शेट्ये या धाडसी तरुणाने वाचविले. कल्याण पूर्वेतील नांदीवली तलावात ही घटना घडली आहे. परंतु उडी मारणाऱ्या तरुणीला प्रियकराने तलावात उडी मारली, असा गैरसमज झाला. त्यानंतर या गैरसमजातून तिने तलावात उडी घेतली होती. काही वेळाने तिचा प्रियकर देखील तिच्या समोर आल्याने तिचा गैरसमज दूर झाला. (Latest Marathi News)

तरुणीने उडी घेण्याआधी काही वेळापूर्वी याच तलावात पोहण्यासाठी गेलेल्या महेश भाटिया या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. मात्र तरुणीचा आपल्याच प्रियकराने उडी मारल्याचा गैरसमज झाला होता. या विचित्र घटनेमुळे कल्याण नांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अन् तरुणाचा बुडून झाला मृत्यू

कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावात काल सायंकाळच्या सुमारास महेश भाटिया हा तरुण पोहण्यासठी गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. दुसरीकडे व्यक्तीने उडी मारल्याची माहिती ऐकताच एका तरुणीने तलावात उडी मारली होती. या तरुणीला या तलाव परिसरात राहणाऱ्या शुभम शेट्ये नावाच्या तरुणाने धाडस दाखवित वाचवले. त्या तरुणीला तलावातून बाहेर काढले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरुणाने वाचवला तरुणीचा जीव

तरुणीने बाहेर येताच सांगितले की, तिच्या प्रियकराने तलावात उडी मारली म्हणून मी उडी मारली होती. परंतु तरुणीच्या आधी उडी मारणारा तिचा प्रियकर नव्हता. त्या व्यक्तीचे नाव महेश भाटिया आहे.

तो तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिचा प्रियकर समोर आला, त्यामुळे गैरसमजातून तरुणीने तलावात उडी घेतली होती. सुदैवाने तिचा जीव बचावला. मात्र या घटनाक्रमामुळे पोलीस देखील चक्रावले .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT