kalyan murbad Road Accident  Saam TV
मुंबई/पुणे

Accident News : कल्याण मुरबाड महामार्गावर भीषण अपघात, टिप्परच्या धडकेत रिक्षाचे दोन तुकडे; चालकाचा जागीच मृत्यू

Satish Daud

अजय दुधाने, साम टीव्ही

अंबरनाथ : कल्याण-मुरबाड मार्गावरील शनिवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या टिप्परने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, टिप्परची धडक बसताच रिक्षाचे दोन तुकडे झाले. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. मोहित द्विवेदी असं मृत रिक्षाचालकाचं नाव आहे. अपघातानंतर टिप्परचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मागील काही दिवसांपासून कल्याण-मुरबाड मार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत. या रस्त्यावर जागोजागी केलेले अतिक्रमण, न लावलेले डिवाईडर आणि चुकीचे बनवलेले स्पीड ब्रेकरमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. विशेष बाब म्हणजे अनेक अपघात होऊन देखील शासन, प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची पुरेशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास या मार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक मोहित द्विवेदी हा शहाड रेल्वे स्टेशनवरून वरप गावात घरी जात होता. त्यावेळी बंजरग हार्डवेअरसमोर भरधाव वेगात आलेल्या टिप्परने रिक्षाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भयानक होता की, रिक्षाचा चेंदामेदा होऊन दोन तुकडे झाले. यामध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर टिप्पर चालक हा घटनास्थळावरुन फरार झाला. त्यानंतर स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रिक्षाचालकाचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. कल्याण-मुरबाड रोडवरील अपघातात अनेकांचा जीव केला असून कित्येकांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आजचे राशीभविष्य, मेषसह या ४ राशींच्या व्यक्तींची आज होणार भरभराट; इतरांकडून होईल वाहवा

Rashi Bhavishya : मंगळवार तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य

Marathi News Live Updates : काँग्रेसला मोठा धक्का; आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवार गटात प्रवेश

Women T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवाने भारताच्या स्वप्नांवर पाणी; टीम इंडिया T20 वर्ल्ड कपमधून बाहेर

Toll-free entry in Mumbai : मुंबईकरांना टोलमाफीचं गिफ्ट; कोणत्या टोलनाक्यावर हलक्या वाहनांना 'टोल फ्री'? VIDEO

SCROLL FOR NEXT