Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

दरीत अडकलेल्या गायीच्या वासराला तरुणांनी दिले जीवदान

काकडवाल गावातील तरुणांनी या वासराला जीवनदान दिले आहे.

साम टिव्ही ब्युरो

कल्याण : मलंगगडच्या डोंगरावर अडकलेल्या एका गाईच्या वासराला वाचवण्यात तरुणांना यश आले आहे. काकडवाल गावातील तरुणांनी या वासराला जीवनदान दिले आहे. त्यामुळे सध्या या तरुणांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरल झाला आहे.

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत होता, पण तरुणांनी अखेर या गाईला वरती सुखरुप काढले.

कल्याण जवळील मलंगगडच्या मागील बाजूस वावंजे परिसरातील दरीत गाईचे वासरू अडकल्याची माहिती काकडवाल गावातील तरुणांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी त्या वासराला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.अखेर अथक प्रयत्नांनंतर या तरुणांनी या वासराला बाहेर काढले आहे.

गेले चार दिवस हे वासरू अडकल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर दहा ते पंधरा तरुणांनी या वासराचे जीव वाचवल्याने या कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

Monday Horoscope : आनंदात दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT