संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याणमधील कुख्यात जालीम गँगचा म्होरक्या अमजद पठाण आणि त्याच्या साथीदारांविरोधात कल्याण पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई केली आहे. अमजद पठाण याची शूटिंग करताना त्याने पत्रकारांना धमकवण्याच्या प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी कुख्यात ड्रग्ज तस्कर अमजद पठाण, काशिम वसईकर, कृष्णा हालेमणी, गणेश मुथू स्वामी आणि सद्दाम शेख यांना पोलिसांनी अटक केली होती.
या कारवाईदरम्यान कल्याण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत सुमारे 34 कोटी रुपयांचा ड्रग्स हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे. ही टोळी राज्यभरात जालीम गँग या नावाने ओळखली जाते. अमजद पठाण याच्यावर केवळ ड्रग्ज तस्करीचेच नव्हे, तर हत्या, हत्येचे प्रयत्न अथवा वसुलीचा प्रयत्न, अपहरण यांसह इतर गंभीर गुन्ह्यांचेही आरोप आहेत.
संघटित पद्धतीने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या या टोळीवर लगाम घालण्यासाठी कल्याण पोलिसांनी मोक्का कायद्याचा वापर केला आहे. या कारवाईमुळे कल्याण परिसरातील संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण डीसीपी अतुल झेंडे, एसीपी अशोक होंनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपास सुरू आहे. ड्रग्स तस्कर अमजद पठाण याला अटक करण्यामध्ये डीसीपी स्कॉर्ड प्रमुख अनिल गायकवाड यांची महत्त्वाची भूमिका मानली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.