Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याणकर संतापले! भूमाफियांविरोधात चक्क 'म्हैस' घेऊन थेट KDMC कार्यालयात धडक, वाचा नेमकं प्रकरण काय?

Kalyan News : कल्याण पूर्वेतील द्वारली पाडा परिसरातील गुरचरण जमिनीवर भूमाफिया आणि बिल्डरांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी म्हैस घेऊन केडीएमसी आय प्रभाग कार्यालयात अनोखे आंदोलन केले. प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचा इशारा.

Alisha Khedekar

  • द्वारली पाडा परिसरातील गुरचरण जमिनीवर अतिक्रमण

  • नागरिकांनी म्हैस घेऊन केडीएमसी आय प्रभाग कार्यालयात अनोखे आंदोलन केले

  • सुमारे ७० ते ८० अनधिकृत चाळी उभारल्याचा आंदोलकांचा दावा

  • कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या बंगल्यासमोर गुरे सोडण्याचा इशारा

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Kalyan East Builders Encroachment Land कल्याण पूर्वेतील द्वारली पाडा परिसरातील गुरे चरणाऱ्या जमिनीवर भूमाफिया आणि बिल्डरांनी अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. तक्रारदार नागरिकांनी थेट म्हैस घेऊन केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयात धडक देत प्रशासनाला निवेदन दिले.

या वेळी आंदोलकांनी म्हैस कार्यालयाबाहेर उभी करून निषेध व्यक्त केला. द्वारली पाडा परिसरातील गुरचरण जमिनीवर पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने भूमाफिया आणि बिल्डरांनी सुमारे ७० ते ८० अनधिकृत चाळी उभारल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या अतिक्रमणामुळे गुरे चारण्यासाठी असलेली मोकळी जागा पूर्णपणे नष्ट झाल्याचेही नागरिकांनी सांगितले.

गुरचरण जागा अतिक्रमणामुळे संपली असून आता गुरांना चारण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यामुळेच प्रशासनाला वास्तव दाखवण्यासाठी म्हैस घेऊन आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे आंदोलकांनी सांगितले.

तसेच, संबंधित अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करून ती जमीन मोकळी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. अन्यथा येत्या काळात सर्व गुरे घेऊन थेट पालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर सोडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT