Kalyan Traffic Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Traffic : कल्याण पूर्व-पश्चिम जोडणारा पूल १० दिवस बंद राहणार, पर्यायी मार्ग काय? जाणून घ्या

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये पूर्व-पश्चिम जोडणारा पूल १० दिवस बंद राहणार आहे. यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग दिले आहेत.

Vishal Gangurde

कल्याणकरांसाठी महत्वाची बातमी

कल्याणमधील आनंद दिघे उड्डाण पूल १० दिवस बंद राहणार

पूलाच्या दुरुस्तीचे काम घेण्यात आलं हाती

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणातील दिवंगत आनंद दिघे उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रशासनाकडून डागडुजीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे कल्याण पूर्व–पश्चिम जोडणारा दिवगंत आनंद दिघे उड्डाणपूल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.हा पूल २५ नोव्हेंबर २०२५ ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत पुलावरील जूने थर काढून नव्या डांबरीकरणाचे काम होणार आहे. या काळात पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवडकर यांनी दिली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी अतिरिक्त मार्ग नियोजन करत ही अधिसूचना पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार जारी केली आहे.

प्रवेशबंदी आणि पर्यायी मार्ग

१) कल्याण पूर्व → कल्याण पश्चिम (आनंद दिघे ब्रिज मार्गे)

स्व. आनंद दिघे ब्रिजकडे जाणाऱ्या सर्व वाहने प्रवेशद्वारावरून प्रवेश बंद.

पर्यायी मार्ग: पुणे लिंक रोड – मक्कीनाका मार्गे किंवा पुणे लिंक रोड – श्रीराम चौक मार्गे पुढील प्रवास.

२) कल्याण पश्चिम → कल्याण पूर्व (सम्राट चौक – वालधुनी ब्रिज मार्गे)

सम्राट चौक येथे आनंद दिघे ब्रिजकडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळणणे बंद.

पर्यायी मार्ग: सम्राट चौक → सरळ पुढे → छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, शांतीनगर → श्रीराम चौक मार्गे पुढील प्रवास.

३) उल्हासनगर → कल्याण पूर्व (सम्राट चौक मार्गे)

शांतीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे प्रवेश बंद.

पर्यायी मार्ग: प्रवेशद्वारातून डावीकडे वळून श्रीराम चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

तत्पूर्वी, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १२:०१ ते ४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२:०० पर्यंत निर्बंध लागू राहतील. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर सेवा, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांची वाहने या निर्बंधातून मुक्त राहतील.पूल दुरुस्ती दरम्यान वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी विनंती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवडकर यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT