KALYAN-DOMBIVLI WATER SUPPLY TO REMAIN SHUT FOR 12 HOURS ON JUNE 2 Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

Kalyan Dombivli Water Supply Cut 2 June : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात २ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. केडीएमसीने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन.

Alisha Khedekar

  • २ जून रोजी कल्याण-डोंबिवलीत १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार

  • केडीएमसीने पाणी साठवून काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले

  • अल निनो आणि उशिरा पावसाळ्याच्या शक्यतेमुळे पाणी नियोजनाचा निर्णय

  • कल्याण, डोंबिवली आणि ग्रामीण भागातील अनेक परिसरांना पाणी कपातीचा फटका

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Kalyan Dombivili Water Supply Cut 12 Hours News कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरातील पाणीपुरवठा मंगळवार २ जून २०२६ रोजी तब्बल १२ तासांसाठी बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) यंदाच्या पावसाळ्यावर अल निनो (El Nino Strom Maharashtra) आणि इंडियन ओशन डायपोल (IOD) चा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पावसाळा उशिरा सुरू होण्याबरोबरच पर्जन्यमानावरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि जलसंपदा विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून विविध महानगरपालिका क्षेत्रांना पाणी नियोजनाचे निर्देश दिले आहेत.

याच अनुषंगाने केडीएमसी (KDMC) प्रशासनाने ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीत भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा (Titwala Water Cut ) जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा मंगळवार २ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

या पाणी कपातीचा परिणाम कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण भागातील अनेक परिसरांवर होणार आहे. मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शाहाड, अटाळी आणि परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच आवश्यक कामांसाठीच पाण्याचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे. पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांत कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT