Water Supply Saam TV
मुंबई/पुणे

Water Supply : कल्याण-डोंबिवलीकर आजच जास्त पाणी भरून ठेवा; गुरूवारी शहरातील पाणीपुरवठा १० तास बंद

Water Supply Remains Closed : गुरुवारी म्हणजेच उद्या कल्याण आणि डोंबिवली परिसरात पाणी बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच जास्त पाणीसाठा करून ठेवावा अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

Ruchika Jadhav

कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. गुरुवारी म्हणजेच उद्या कल्याण आणि डोंबिवली परिसरात पाणी बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच जास्त पाणीसाठा करून ठेवावा अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावे जलशुद्धीकरण केंद्र आणि नेतेवली जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व पश्चिम, डोंबिवली पूर्व पश्चिम येथे पाणीपुरवठा केला जातो. या जलवाहिन्यांवर अनेक ठिकामी पाणी गळती होती.

होणारी पाणी गळती तसेच बारावी जलाशुद्धीकरण केंद्र आणि नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रमधील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणाची दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

१० तास पाणी बंद

या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी (6 जून)ला सकाळी ८ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १० तास महापालिकेच्या नेतिवली आणि बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे . नागरिकांनी पाण्याचा साठा करून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केलं आहे. तसेच १० तासांनंतर देखील काही वेळ कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: आताच सावध व्हाल, वारेमाप खर्च होणार, काहींना अचानक भरपूर पैसा मिळणार, वाचा राशीभविष्य

Goa Tourism : बोटीतून करा 'या' आयलंडची सफर, गोव्यात लपलंय निसर्गाचे सुंदर रत्न

Maharashtra Live News Update: सोलापुरातील नाथ संकुलातील ७ मजली इमारतीमध्ये लागली आग

दारू पिऊन सारखा त्रास द्यायचा; बायकोची सटकली, जबर मारहाणीत पतीचा मृत्यू

LPG Cylinder: बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

SCROLL FOR NEXT