KALYAN DOMBIVLI WATER CRISIS saam tv
मुंबई/पुणे

कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीटंचाईचं संकट! उल्हास नदीची पातळी घटली, MIDC चाही ठेंगा

Water Supply Hit in Kalyan-Dombivli: कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. उल्हास नदीची पाणीपातळी घटल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून एमआयडीसीच्या ३६ तासांच्या शटडाउनमुळे नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

राज्यभरात सध्या दुष्काळाने थैमान घातले आहे. एलनिनोच्या प्रभावामुळे पावसाने दडी मारली असून बळीराजा देखील ऐन सणासुदीच्या तोंडावर संकटात सापडला आहे. तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील आता उद्भवला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रामुख्याने उल्हास नदीतून पाणी उचलून शहराचा पाणीपुरवठा करते. मात्र, सध्या नदीची पाणीपातळी झपाट्याने घटत असल्याने मोहने उदंचन केंद्रातून पाणी उचलण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून कल्याण पूर्व आणि पश्चिम विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.दुसरीकडे, एमआयडीसीकडून केडीएमसीला ५५ एमएलडी पाणी मिळत आहे.

त्यातच एमआयडीसीकडून ३६ तासांची पाणीकपात सुरू असल्याने महापालिकेसमोर पाणी नियोजनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर बारावे धरणातील पाणी उल्हास नदीत सोडावे किंवा एमआयडीसीकडून मंजूर असलेला उर्वरित पाणी कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापालिकेकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात केडीएमसी आयुक्तांनी सोमवारी एमआयडीसी आणि पाटबंधारे विभागासोबत बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या बैठकीतून पाणीटंचाईवर काय तोडगा निघणार, याकडे कल्याण-डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान एमआयडीसीकडून घेण्यात येणारा ३६ तासांचा पाणीपुरवठा शटडाउन कमी करण्यात यावा, यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर हर्षाली थविल आणि महापालिका आयुक्त यांच्यात बैठक होऊन चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान एमआयडीसीचा शटडाउन कालावधी कमी करण्याची विनंती केडीएमसीच्या वतीने करण्यात आली असून, एमआयडीसीकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती महापौर हर्षाली थविल यांनी दिली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशा परिस्थितीत एमआयडीसीकडून ३६ तासांचा शटडाउन घेतल्यास नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आधीच एक दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यात शटडाउनमुळे आणखी मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शटडाउनचा कालावधी कमी करण्याची मागणी केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या संदर्भात महापौर हर्षाली थविल आणि महापालिका आयुक्त यांच्यात झालेल्या चर्चेत नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने एमआयडीसीशी चर्चा करण्यात आली. या मागणीला एमआयडीसीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. मात्र, शटडाउनचा कालावधी नेमका किती कमी होणार, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे, सातारा अन् अहिल्यानगरला अवकाळीने झोडपलं; विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस; शेतकऱ्यांचं उरलं-सुरलं पीकही...

CM फडणवीसांकडून संभाजीनगरला मोठं गिफ्ट! EV चार्जिंग स्टेशन, सौरऊर्जा प्रकल्प अन् AC बस; कोट्यावधी विकासकामांचे लोकार्पण

Maharashtra News Live Update: उद्घाटनापूर्वीच मान मेट्रो स्टेशनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महायुतीची राजकीय खेळी; जळगावसह सोलापुरातील 6 जागा बिनविरोध

DA Hike 2026: पेन्शनमध्ये थेट 3% वाढ! 60% वरून DR झाला 63%, तुमच्या खात्यात आता किती रुपये जमा होणार?

SCROLL FOR NEXT