कल्याण-डोंबिवलीत राजकीय वाद उफाळला, भाजप-मनसेच्या नेत्यांमध्येच जुंपली Saam TV
मुंबई/पुणे

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

Kalyan - Dombivli Politics News : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं असून, सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली आहे. महासभा तहकूब केल्यानं विरोध करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपच्या स्थानिक नेत्यानं खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळे यापुढील काळात सत्ताधारी पक्षांमधील सुप्त संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Nandkumar Joshi

संघर्ष गांगुर्डे, कल्याण | साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सुरू झालेला राजकीय संघर्ष निकाल आणि सत्ता स्थापन केल्यानंतरही कायम आहे. मात्र, हा संघर्ष सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील नाही तर तो सत्ताधारी पक्षांमध्येच सुरू असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला सुप्त संघर्ष आता उघडपणे दिसू लागला आहे. सत्ताधारी पक्षांमधील भाजप आणि मनसेमध्ये हे वाकयुद्ध सुरू आहे. महापालिकेची महासभा तहकूब करण्याच्या मुद्द्यावरून हा वाद चिघळला आहे. मनसेचे नवी मुंबईतील पदाधिकारी गजानन काळे यांनी या वादात उडी घेतल्यानंतर भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कल्याण - डोंबिवली महापालिकेची महासभा तहकूब केल्यानंतर भाजप-मनसेतील राजकीय वाद उफाळून आला आहे. मनसेचे पदाधिकारी गजानन काळे यांनी नवी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेची महासभा तहकूब करण्याच्या भाजपच्या भूमिकेला विरोध दर्शवला. त्यावर भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी काळेंवर टीकास्त्र डागून त्यांना थेट इशारा दिला आहे.

गजानन काळे यांनी कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणावर तत्त्वज्ञान शिकवू नये, असा टोला दीपेश म्हात्रे यांनी लगावला. मागून आलेले लोक नेते झाले. राजू पाटील नेते झाले. अविनाश जाधव नेते झाले; मात्र गजानन काळे अजूनही शहरप्रमुखच आहेत, अशी बोचरी टीकाही म्हात्रे यांनी केली.

गजानन काळे यांनी महासभा तहकूब करण्याच्या मुद्द्यावरून भाजपला बोलू नये, असेही म्हात्रे म्हणाले. काळेंसारख्या लोकांना भारतीय जनता पक्ष कोणतीही किंमत देत नाही, असंही ते म्हणाले. यावेळी म्हात्रे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य करत, रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात बोललं की त्यांच्या पक्षात मोठं पद मिळतं, असा नवा ट्रेंड महाराष्ट्रात आला आहे. त्यासाठीच गजानन काळेंचा हा खटाटोप सुरू आहे, असा आरोपही केला.

गजानन काळे यांनी नवी मुंबईतील राजकारणाकडे लक्ष द्यावे आणि कल्याण-डोंबिवलीत शहाणपणा शिकवू नये, असा थेट इशारा दीपेश म्हात्रे यांनी दिला. मनसेच्या सत्तेतील सहभागावरही त्यांनी निशाणा साधला. सत्तेचा लाडू खाण्यासाठी मनसे सत्तेत आहे. सत्तेचा मलिदा खाण्यासाठी मनसेचे लोक सत्तेत बसले आहेत, असंही ते म्हणाले. दरम्यान, यापुढे भाजपच्या नेत्यांबद्दल वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही दीपेश म्हात्रे यांनी काळेंना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

SCROLL FOR NEXT