Maharashtra Political news : Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Political news : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारीवरून पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

शिवसेना नेत्याच्या मुलाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे वंडार पाटील आणि इतर दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणाचा तपास आता ठाणे क्राईम ब्रँचकडे वर्ग सोपवण्यात आलाय

वंडार पाटील यांनी आरोप फेटाळले

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

​kalyan News : कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात एक मोठी आणि धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. या वृत्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राजकारणामध्ये एकमेकांचे वैमनस्य, सूड आणि प्रतिस्पर्धेतून अनेकदा संघर्ष होताना आपण पाहिलं आहे. पण आता थेट ४ कोटी रुपयांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेना (शिंदे गट) चे कल्याण तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक महेश पाटील यांचा मुलगा आणि उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते वंडार पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश पाटील यांना वंडार पाटील यांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी नुकतंच न्यायालयाने निर्दोष सोडले होते, याच रागातून त्यांनी हा सूडाचा कट रचल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही, तर 'बदल्यात मुलगा' या भूमिकेतून महेश पाटील यांच्या मुलाला संपवण्याचाही कट होता. सध्या याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते वंडार पाटील ,​मुजम्मिल बुबेरे (सुपारी घेणारा) अन्य ​एक अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तसेच या प्रकरणाचा गुन्हा ठाणे क्राईम ब्रँच कडे वर्ग केला आहे. मात्र या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असून अशा प्रकारची कुठली सुपारी आम्ही दिली नाही. वंडार पाटील पुढे म्हणाले, या प्रकरणात निर्दोष सुटका झाली आहे आणि यासाठी हायकोर्टात अपील करू नये यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे'

या घटनेमुळे घाबरलेल्या महेश पाटील यांनी पोलिसांकडे मागणी करताना म्हटलं की, काही दिवसांपूर्वी पुण्यात आई-वडिलांच्या रागात मुलाची ज्या पद्धतीने हत्या झाली. त्याच प्रकारे माझ्या मुलाचीही हत्या होऊ शकते. त्यामुळे या आरोपींना त्वरित अटक करावी'. मात्र या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना केंद्रीय मंत्र्यांची खुली ऑफर, राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

Ambenali Ghat Closed: आंबेनळी घाट ४ दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणते? VIDEO

Saturday Horoscope : नवी संधी मिळणार; ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: रत्नागिरी - खेड शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरलं जगबुडी नदीच्या पुराचं पाणी

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सान्निध्यातील प्राजक्ता माळीचं आलिशान फार्महाऊस; जाणून घ्या एका दिवसाचं भाडं

SCROLL FOR NEXT