KDMC General Body approves property tax name transfer for notary-based homes, bringing relief to thousands of residents. saam tv
मुंबई/पुणे

KDMC चा मोठा निर्णय! नोटरी घरांवरील कर नाव हस्तांतरणास हिरवा कंदील

KDMC Property Tax Name Transfer For Notary Homes: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून नोटरी पद्धतीने खरेदी-विक्री झालेल्या घरांच्या मालमत्ता कर नाव हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेमध्ये भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जनहिताचा विषय उपस्थित करत नोटरी पद्धतीने खरेदी-विक्री झालेल्या घरांच्या मालमत्ता कर नाव हस्तांतरणाचा मुद्दा मांडला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळत महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शहरातील अनेक चाळी आणि जुन्या वस्त्यांमधील घरे नोटरी पद्धतीने खरेदी-विक्री करण्यात आली आहेत. मात्र अशा घरांच्या मालमत्ता कराच्या नोंदी जुन्या मालकांच्या नावावरच राहिल्याने नवीन मालकांना विविध शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रत्यक्ष घराचा मालक वेगळा असला तरी करपावती जुन्या मालकाच्या नावावर असल्याने अनेक नागरिक वर्षानुवर्षे त्रस्त होते.

याबाबत महासभेत विषय मांडताना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी जुन्या करदात्याच्या नावावरून नवीन करदात्याच्या नावावर मालमत्ता कर हस्तांतरण करण्यास परवानगी देण्याची मागणी केली. यामुळे नागरिकांच्या समस्या दूर होतील तसेच महापालिकेच्या कर विभागालाही प्रत्यक्ष मालकांची माहिती उपलब्ध होऊन थकबाकी वसुली अधिक प्रभावीपणे करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होणार असून कर प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल. महासभेने या कामास मंजुरी दिल्याने लाखो सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्येवर तोडगा निघाला आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेची नोंद अधिकृतपणे स्वतःच्या नावावर करता येणार असून महापालिकेच्या महसूल व्यवस्थेलाही त्याचा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांना बसणार फटका?

पुण्यात पाणी संकट आणखी गडद; कोणत्या धरणात किती साठा? ताजी आकडेवारी आली समोर

Skin Care: चेहऱ्यावर रोज टॅल्कम पावडर लावता? मेकअप आर्टिस्ट म्हणतात यामुळे चेहऱ्याला होतात हे त्रास

Maharashtra News Live Update: अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

काळे की पिवळे, आरोग्यासाठी कोणते खजूर सर्वात बेस्ट?

SCROLL FOR NEXT