kalyan dombivli rain, train,  saam tv
मुंबई/पुणे

Kalyan-Dombivli Rain News : पावसानं उडवली दैना... डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात पाणीच पाणी, कल्याण- नगर महामार्गावरील वाहतूक बंद (पाहा व्हिडिओ)

kalyan dombivli rain

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

Kalyan Dombivli News : कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाची अधून मधून हजेरी हाेती. गेले दोन तासांपासून कल्याण डोंबिवलीत पावसाने चांगला जोर धरला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात पाणी साचल्याने प्रवाशांची अडचण झाली आहे. (Maharashtra News)

गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत पावसाची येजा सुरू होती. आज सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ते जलमय झाले.

24 तास वर्दळीचा असणाऱ्या या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. नागरिक देखील या पाण्यातून वाट काढताना दिसून येत होते. अंबरनाथ बदलापूर दरम्यान रेल्वे रुळावर पाणी असल्याने पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसला. कल्याण स्टेशनवर रेल्वे वाहतूक दहा ते बारा मिनिटे उशिराने असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान पावसामुळे (rain) कल्याण नगर महामार्गांवरील रायते पुलावर नदीचे पाणी येण्यास सुरुवात झाली. पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाल्याने कल्याण नगर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कल्याण नगर महामार्गावरील पांजरपोळ गावाजवळील रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने वाहतूक कोंडी झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

SCROLL FOR NEXT