kalyan dombivli  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli : डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारती तोडणार; पालिकेकडून पुन्हा नोटीस, हजारो नागरिक होणार बेघर?

Kalyan Dombivli news :डोंबिवलीतील ५५ अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांना पुन्हा नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचं टेन्शन वाढलंय.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण : महारेरा घोटाळ्यामधील 65 अनधिकृत इमारती प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने पुन्हा ५५ इमारतींना पुन्हा नोटीस धाडली आहे. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या लोकांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. पालिकेच्या नोटीसमुळे इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचं टेन्शन वाढलं आहे.

कल्याण-डोंबिवलीत ५५ अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या लोकांना ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. पालिकेकडून महारेरा घोटाळ्यातील इमारती अनधिकृत ठरवण्यात आल्या होत्या. यासाठी काही महिन्यांपूर्वी पालिकेने नोटीस धाडली होती. त्यानंतर केडीएमसीने पुन्हा नोटीस धाडत तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. इमारत रिकामी केली नाही, तर पोलीस पळाचा वापर करण्याचा इशारा देखील पालिकेने दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे असल्याने इमारतींवर कारवाई करावी लागणार आहे, यामुळे पालिकेने पुन्हा नोटीस धाडल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, रेरा अधिकारी, पालिका अधिकारी, भू माफिया आणि राजकीय मंडळी यांच्या अभद्र संगनमताने रेरा घोटाळा झाला होता.

याचिकाकर्ते संदीप पाटील काय म्हणाले?

याचिकाकर्ता संदीप पाटील म्हणाले, 'कोर्टाने १९ नोव्हेंबर रोजी ६५ इमारतींवर तीन महिन्यांत कारवाई करण्याचे आदेश केडीएमसीला दिले होते. न्यायालयाच्या आदेशाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. केडीएमसीने आता पुन्हा नोटीस देऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केलाय. अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा या महिन्यात केडीएमसीला नोटीस देण्यात आली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

Maharashtra Politics: मोठी बातमी! कोकणातील बडा नेता भाजपच्या गळाला; उद्या थाटामाटात होणार पक्षप्रवेश

Crime: प्रेमसंबंधाला विरोध, बापाने मुलीला संपवलं; आधी कीटकनाशक पाजलं नंतर...

Narayan Rane : मोठी बातमी! भाजप नेते खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT