eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Politics : भाजपला जबरी धक्का, डोंबिवलीतील ४ नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Dombivli Politics : डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. चार माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Namdeo Kumbhar

संघर्ष गांगुर्डे / साम टीव्ही न्यूज / डोंबिवली

Eknath Shinde latest news : डोंबिवलीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाच्या चार माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदारांच्या उपस्थितीत पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीतील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असून, येणाऱ्या काळासाठी हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

यावेळी भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तसेच 'उबाठा' गटाचे उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर, केडीएमसीच्या निवृत्त सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले.

नुकतेच राज्य सरकारने पिंपळेश्वर महादेव मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १४ वर्षांच्या संघर्षानंतर हा निर्णय झाल्याने, खासदार श्रीकांत शिंदे यांनी पिंपळेश्वर महादेव मंदिरात जाऊन भगवान शंकराचा अभिषेक व दर्शन घेत कृतज्ञता व्यक्त केली.

पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबतही सूचक वक्तव्य केले. शिवसेनेच्या दोन जागा बिनविरोध होण्याबाबत सकारात्मक संकेत देताना त्यांनी, "सरकारवर सर्वांचा विश्वास असल्याने याबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो," असे म्हटले.

केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, तर श्रीकर चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले राजकीय नशीब आजमावले होते. आता या सर्व नेत्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाची दांडी

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

Crime : घराला कुलूप लावून बाहेर पडताय? सावधान! मुंबईतील 'या' चोराची मोडस ऑपरेंडी ऐकून चक्रावून जाल

BP - Diabetes : ब्लड प्रेशर अन् डायबिटीजची औषधं घेताना सावधान! 'ही' १ चूक ठरू शकते धोकादायक

SCROLL FOR NEXT