Kalyan Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: धक्कादायक! तलवारीने हल्ला करत हॉटेल मॅनेजरला लुटले; दीड लाखाची रोकड लंपास

Hotel Manager Attacked And Robbed In Kalyan: मॅनेजरच्या हातातील दीड लाख रोकड व स्कूटी घेवून दोन हल्लेखोर पसार झाले आहेत.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, प्रतिनिधी...

Kalyan Crime News: प्राणघातक हल्ला करत हॉटेल मॅनेजरला लुटल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमधील नांदिवली परिसरात घडला आहे. भीमा सिंग असे जखमीचे नाव तरुणाचे नाव असून त्यांच्याकडील दीड लाख रोकड व स्कूटी घेवून हल्लेखोर पसार झालेत. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याणच्या नांदिवली परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. डोक्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करत हॉटेल मॅनेजरला लुटल्याचे उघडकीस आले आहे. मॅनेजरच्या हातातील दीड लाख रोकड व स्कूटी घेवून दोन हल्लेखोर पसार झाले आहेत. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये भीमा सिंग हा तरुण जखमी झाला आहे. (Kalyan Crime News)

जखमी हॉटेल मॅनेजरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याआधी हातात तलवार घेवून फिरणारे आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यावरुन कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

Hair Care : केसांना मोकळे सोडून झोपावे की बांधून? काय योग्य? जाणून घ्या...

'मार्व्हल'स्टाईल कॅम्पेनने भाजपची मुंबईच्या प्रचारात आघाडी, विरोधक राहिले मागे

Bigg Boss Marathi 6 : "तोंड शेणात घाल..."; बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी तन्वी कोलते अन् रुचिता जामदार यांच्यात राडा; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिक पुणे महामार्ग ठप्प! रेल्वेसाठी रास्ता रोको

SCROLL FOR NEXT