Kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यात मोबाईल चोरट्याचा धुमाकूळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai Crime News: मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यात मोबाईल चोरट्याचा धुमाकूळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Kalyan Crime News:

रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांचे, महिलांचे मोबाईल हिसकावून धूम ठोकणाऱ्या इराणी चोरट्याला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हसन सय्यद असे या इराणी चोरट्याचं नाव आहे. हसन कायम नशेत धुंद असतो.

हसन विरोधात मुंबई नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. तो काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. कल्याणमध्ये एका मोबाईल स्नेचिंगच्या प्रकरणात हसन सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. पोलिसांनी त्याचा माग काढत कल्याण जवळच्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून सापळा रचत त्याला बेड्या ठोकल्यात.

मिळालेल्या माहितीनुसार, हसन सय्यद आधी नशा करायचा त्यानंतर दुचाकी चोरायचा, चोरलेल्या दुचाकीच्या साहाय्याने मोबाईल हिसकावून धूम ठोकायचा. त्यानंतर दुचाकी कुठेही सोडून पळून जायचा. (Latest Marathi News)

ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरात हसनने मोबाईल स्नेचिंग करत धुमाकूळ घातला होता. कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याने बोलणाऱ्या एका तरुणाचा महागडा हिसकावून पळ काढला. यावेळी तो सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस अधिकारी तानाजी वाघ, श्रीनिवास देशमुख यांच्या पथकाने हसनचा शोध सुरू केला. पोलिसांनी कल्याण जवळच्या आंबिवली येथील इराणी वस्तीत सापळा रचत अटक केलीय. त्याच्या जवळून चोरी केलेला दीड लाखांचा मोबाईल देखील हस्तगत करण्यात आलाय. महात्मा फुले पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT