KALYAN MURDER CASE: MARRIED WOMAN KILLED INSIDE HOUSE, FATHER MISSING Saam tv
मुंबई/पुणे

भयंकर! आदल्या दिवशी माय-लेकीला फिरायला नेलं, दुसऱ्या दिवशी जीव घेतला, क्रूर बापाच्या कृत्याने कल्याणमध्ये खळबळ

Man Killed His Daughter In Kalyan : कल्याण पश्चिममध्ये एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका विवाहित महिलेचा तिच्या घरात मृतदेह आढळून आला आहे. महिलेच्या हत्याकांडानंतर तिचे वडील फरार आहेत.

Bharat Jadhav

  • कल्याण पश्चिमेत विवाहित महिलेची हत्या झाल्याची घटना उघड.

  • मृत महिलेचे नाव गायत्री शिंदे असल्याची माहिती.

  • हत्येनंतर वडील विनोद वसईकर फरार.

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

कल्याण पश्चिमेत विवाहित महिलेची घरात हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव गायत्री शिंदे असे असून, हत्येनंतर तिचे वडील विनोद वसईकर फरार झाल्याने संशयाची सुई त्यांच्याकडे वळली आहे. बाजारपेठ पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडी परिसरातील रचना रॉयल इमारतीत वसईकर कुटुंब वास्तव्यास आहे. विनोद वसईकर हे खाजगी काम करतात, तर पत्नी आणि मुलगा खासगी नोकरी करत आहेत. गायत्रीचे नोव्हेंबर २०२५ मध्ये लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी ती माहेरी आली होती. रविवारी संपूर्ण कुटुंब एकत्र चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर संध्याकाळी गायत्री, तिची आई आणि वडील काला तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यामुळे कुटुंबात कोणताही वाद असल्याचे बाहेरून दिसून येत नव्हते.

मात्र सोमवारी दुपारी गायत्रीने आईला फोन करून आपण आणि वडील घरी असल्याचे सांगितले होते. रात्री आई कामावरून घरी परतल्यानंतर घराचे दार उघडताच तिला गायत्रीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसला. तिने तातडीने मुलाला माहिती देत पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विनोद वसईकर सकाळी कामावर गेल्यानंतर काही वेळात पुन्हा घरी परतल्याचे दिसून आले. तसेच दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ते घाईघाईने इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर ते फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तीन विशेष पथके रवाना केली आहेत.

विनोद वसईकर यांनीच स्वतःच्या मुलीची हत्या केली का आणि त्यामागचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतरच या हत्येमागील कारण समोर येण्याची शक्यता असून बाजारपेठ पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT