Kalyan Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Crime News : कल्याण भाजी मार्केटमध्ये चोरांचा सुळसुळाट; मोबाईल लंपास करणाऱ्या चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Crime News : कल्याण भाजी मार्केटमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट; पोलिसांनी चोरांच्या आवळल्या मुसक्या

Ruchika Jadhav

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजी आणि फळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे सतत फोन चोरीला जात होते. भाजी विक्रेत्यांचे मोबाईल गर्दीचा फायदा घेत चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शहबाज शेख आणि इरफान शेख अशी आहेत. या दोघांवर याआधीही मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या चोरट्यांकडून सहा मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांचे आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. पहाटेच्या वेळी, सकाळी, तसेच रात्रीच्या सुमारास या घटना घडत होत्या.

गर्दीचा फायदा घेत चोरटे मोबाईल लंपास करत होते. अशाच एका मोबाईल चोरीच्या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नवनाथ रूपवते, बाबासाहेब डुकले, ए.एस.आय. सुरेश पाटील, आणि हवालदार सचिन साळवी यांच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान, शहबाज शेख याला गोविंदवाडी परिसरातून अटक करण्यात आली, तर त्याचा साथीदार इरफान हा एपीएमसी मार्केटमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचत इरफानलाही अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून चोरीची दुचाकी आणि सहा महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. शहबाज आणि इरफान यांच्याकडून आणखी मोबाईल चोरीला गेले असावेत, असा संशय पोलिसांना असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांचा विजय

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

Weekly Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT