>> अभिजित देशमुख
Kalyan Crime News: ज्वेलर्स शेजारी असलेल्या दोन दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडत अज्ञात चोरट्यानी ज्वेलर्सच्या दुकानात चोरी केल्याची घटना कल्याण पश्चिम बिर्ला कॉलेज रोड परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्स मध्ये काल मध्यरात्रिच्या सुमारास घडली. या चोरट्यानी दुकानात शिरताच सीसीटीव्हीची वायर काढली. त्यानंतर गॅस कटरने दुकानातील मुख्य तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला.
मात्र अचानक गॅस बंद झाल्याने त्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर या चोरट्यांनी दुकानाच्या शोकेस मधील दागिने चोरले व पसार झाले. दरम्यान काही दिवसापूर्वी ज्वेलर्सच्या दोन दुकाने सोडून काही तरुणांनी मोबाईल शॉप सुरु करण्यासाठी एक गाळा भाड्याने घेतला होता. या तरुणांकडूनही ही दुकानफोडी केली असल्याचे सांगितले जात आहे. खडकपाडा पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. भाड्याने दुकाने, घरे देताना दुकानमालक घरमालकांकडून अजूनही निष्काळजीपणा केला जात असल्याचा प्रकार या घटनेमुळे समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान आहे. आज सकाळी दुकानाचे मालक जेव्हा दुकानात आले. तेव्हा दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त होते. दुकानाच्या आत जाऊन त्यांनी पाहिले. त्याठिकाणी गॅस कटर आणि सिलिंडर आढळून आला.
दुकानाच्या भिंतीला मोठे भगदाड पाडल्याचे दिसून आले. त्यांनी लॉकर तपासला असता मुख्य लॉकर चोरटे फाेडू शकले नव्हते. दुकानाच्या शोकेसमधील दागिने चोरून चोरट्यांनी पळ काढला होता. चोरटे शेजारच्या दोन दुकानाना भगदाड पाडत ज्वेलर्सच्या दुकानात शिरले होते. मात्र गँस कटरचा गॅस संपल्याने त्यांना लॉकर फोडता आला नाही. काही दिवसापूर्वी त्यांच्या दुकानाच्या रांगेतील दोन दुकाने सोडून काही तरुणांनी मोबाईल शॉप सुरु करण्याच्या नावाखाली एक गाळा भाड्याने घेतला होता. (Latest Marathi News)
आज सकाळपासून हे दुकान बंद असून हे तरुण देखील गायब आहेत. त्याच तरुणांनी ही चोरी केल्याचा संशय ज्वेलर्सचे मालक व पोलिसांना आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ज्वेलर्समध्ये शिरताच चोरट्यांनी सीसीटीव्ही बंद केला होता. हे चोरटे नेपाळचे असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.