Kalyan Khadakpada Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: गणेशमूर्ती विक्रेत्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण, गरोदर पत्नीला धक्काबुक्की; कल्याणमधील घटना

Kalyan News: गणेशमूर्ती विक्रेत्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण, गरोदर पत्नीला धक्काबुक्की; कल्याणमधील घटना

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Kalyan Crime News: 'तुला या जागेवर स्टोल लावायचा असेल तर मला पैसे दे', अशी मागणी करत गणेशमूर्ती विक्रेत्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण खडकपाडा परिसरात रविवारी रात्री घडली.

कल्पेश आर्या असे जखमी मूर्ती विक्रेत्याचे नाव असून कल्पेशवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरनी खडकपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या राजेश केने विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण खडकपाडा परिसरात कल्पेश आर्या हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. गणेश उत्सवासाठी कल्पेश खडकपाडा परिसरात स्टॉल लावून गणेश मुर्त्या विक्री करतो. यंदा देखील त्याने खडकपाडा परिसरात गणेश मूर्ती विक्री करण्याचा स्टॉल लावला आहे. (Latest Marathi News)

रविवारी रात्री राजेश केणे नावाचा इसम त्याच्या स्टॉलवर आला. तुला इथे स्टॉल लावायचा असेल तर मला पैसे दे असे म्हणत पैशांची मागणी सुरू केली. कल्पेशने ज्यांची जागा आहे. त्यांना पैसे देतो, असे सांगत पैसे देण्यास नकार दिला. संतापलेल्या राजेश केने यांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने कल्पेशला मारहाण केली. इतकेच नाही तर कल्पेशला वाचवण्यासाठी आलेल्या कल्पेशच्या गरोदर पत्नीला देखील धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.

या मारहानीत कल्पेशला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात राजेश केने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT