Kalyan Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Crime : भयंकर! ८ वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन मुलाकडून बलात्कार; ब्लेडने वार करत केली हत्या

कल्याण स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय मुलाने ८ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर ब्लेडने वार करून तिची हत्या केली.

प्रदीप भणगे

Mumbai Kalyan Crime News : मुंबईच्या कल्याण स्टेशन (Kalyan) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय मुलाने ८ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर ब्लेडने वार करून तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलासह एकाला ताब्यात घेतलं असून घटनेचा तपास सुरू केला. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील न्यू मोनिका इमारतीच्या आवारात एका ८ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याबाबत महात्मा फुले पोलिसाना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

या अल्पवयीन मुलीवर लैंगिकअत्याचार करत तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत दोन संशयितांना ताब्यात घेतलं. दोघेही अल्पवयीन असून एकाचे वय १५ वर्ष असल्याची माहिती आहे.

मृत मुलीच्या वडिलांनी १५ वर्षीय मुलाला मारले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून त्याने ८ वर्षीय मुलीवर आधी बलात्कार  (Crime News)  केला. त्यानंतर ब्लेडने वार करत तिची हत्या केली. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं आहे.

तसेच या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. एका अल्पवयीन मुलीने ८ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळ अन् मुंबई मेट्रो-३ चे उद्घाटन

Navi Mumbai Airport : नवी मुंबई, नवं उड्डाण! पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज विमानतळाचे लोकार्पण

Zodiac Signs Today: बुधाचा उच्चस्थानी योग, सूर्य-चंद्राचा संयोग; या ४ राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास

Gold Rate : सोनं प्रति तोळा ७७ हजारांवर येणार, धक्कादायक कारण आलं समोर, वाचा...

Mosquitoes : दारू पिणारे डासांना चावायला आवडतात? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT