Kalyan Railway Fraud Police Officer News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : ६० हजारांचा मोह, तो बुकिंग क्लर्क अन् अलगद जाळ्यात अडकला रेल्वेचा तोतया व्हिजिलन्स इन्स्पेक्टर

Kalyan Railway Fraud Police Officer News : कल्याण रेल्वे परिसरात स्वतःला रेल्वे व्हिजिलन्स इन्स्पेक्टर असल्याचे भासवून ६० हजार रुपयांची मागणी करत होता. तोतया पोलिसाला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • कल्याणमध्ये तोतया रेल्वे व्हिजिलन्स इन्स्पेक्टर अटकेत

  • अडकलेले पैसे काढून देतो म्हणत ६० हजारांची मागणी

  • सापळा रचून २० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकड

  • आरोपीकडून आणखी फसवणूक झाली का याचा तपास सुरू

  • घटनेनंतर रेल्वे परिसरात खळबळ

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण मधून मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण रेल्वे परिसरात एक तोतया पोलीस व्हिजिलन्स इन्स्पेक्टरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या तोतया इन्स्पेक्टरने अडकलेले पैसे काढून देतो, असे आमिष दाखवत तब्बल ६० हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी सापळा रचून पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि तोतया पोलिसाला बेड्या ठोकल्या. या आरोपीचे नाव हरीश कांबळे असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरीश कांबळे हा स्वतःला रेल्वे व्हिजिलन्स इन्स्पेक्टर असल्याचे भासवत होता. संबंधित बुकिंग क्लार्कचे रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात अडकलेले पैसे काढून देतो, असे आमिष दाखवत त्याने तब्बल ६० हजार रुपयांची मागणी केली होती.

या प्रकरणाची माहिती रेल्वे व्हिजिलन्स विभागाला मिळाली. माहिती मिळताच रेल्वे व्हिजिलन्स विभागाने तात्काळ कारवाईचे पाऊल उचलले. व्हिजिलन्स पथकाने सापळा रचून बुकिंग क्लार्ककडून २० हजार रुपये स्वीकारण्याचा बनाव रचला. ठरल्याप्रमाणे सापळा रचून पोलिसांनी हरीशला घेराव घातला. त्याच्याकडे २० हजार रुपये घेऊन एक माणूस पाठवला. आरोपीने रक्कम स्वीकारताच पोलिसांची खात्री पटली.

लगेचच व्हिजिलन्स पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर हरीश कांबळेला कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून, आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत.या धक्कादायक प्रकारानंतर खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Brother Death : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; भावानं विषारी कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: मुंबई उच्च न्यायालयाची पुणे महापालिकेला नोटीस

माजी पंतप्रधान आणि माजी गृहमंत्र्यांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Bank Holidays: कामाची बातमी! एप्रिल महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार; RBI ने जारी केली सुट्टयांची यादी

Zodiac Signs: ‘या’ 3 राशींचे लोक असतात सर्वात नशीबवान; आयुष्यात मिळतो पैसाच पैसा, पण कधी?

SCROLL FOR NEXT