Kalyan Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: शुल्लक कारणावरुन वाद, लायब्ररीत अभ्यासासाठी गेलेल्या दोघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण

Kalyan Latest News: या मारहाणीत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी

Kalyan Crime News:

लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना किरकोळ वादातुन लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला. या मारहाणीत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण पूर्व परिसरात राहणारे चंद्रप्रकाश यादव आणि रॉबिन सिंग हे दोघे विद्यार्थी आज दुपारच्या सुमारास कल्याण काटेमानवली पुलाजवळ असलेल्या लायब्ररी मध्ये अभ्यास करण्यासाठी गेले होते.

अभ्यास आटोपून लायब्ररी खाली उतरले याचवेळी एका तरुणाने किरकोळ वादातून त्यांना शिवीगाळ केली. दोघांनी या तरुणांना जाब विचारताच संतापलेल्या तरुणांनी चंद्रप्रकाश यादव आणि रॉबिन सिंग या दोघांना लोखंडी रॉडने ठोशा, बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या मारहाणीत चंद्रप्रकाश यादव आणि रॉबिन सिंग दोघांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .तर या प्रकरणी कोळसेवाडी पोलीसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा

Numerology: या तारखेला जन्मलेली व्यक्ती असते श्रीमंत, राजसारखे आयुष्य जगते

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

SCROLL FOR NEXT