Ambernath Shocking News Saam tv
मुंबई/पुणे

Ambernath Shocking : एकाच दोरीने दोघांनी आयुष्य संपवलं; प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल, अंबरनाथमध्ये खळबळ

Ambernath Shocking News : अंबरनाथमध्ये दोघांनी आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. प्रेमी युगुलाच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अजय दुधाणे, साम टीव्ही

अंबरनाथ : नाशिकमधील सप्तश्रृंगीगडावरून प्रेमीयुगुलाने आयुष्य संपवल्याची घटना ताजी असताना अंबरनाथमध्येही एका प्रेमीयुगुलाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. एकाच दोरीने दोघांनी दोघांनी आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचे मृतदेह कुशिवली गावाजवळ झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. दोघांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावात दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एकाच दोरीने दोघांनी आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस घटनास्थळी पोहोचले.

मनिषा महेश पाटील आणि विवेक विठ्ठल पाटील अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी दोघांचे मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवले आहेत. दोघेही कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणारे असल्याची माहिती मिळत आहे. दोघांच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरून दोघांनी आयुष्य संपवलं

सप्तश्रृंगीगडाच्या शीतकड्यावरून युवक-युवतीने आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोघांनी 26 मे रोजी दुपारी अडीच वाजताच्या उडी मारल्याचा अंदाज आहे. अदित्य संजय देशमुख आणि मोनिका किसन शिरसाठ असे दोघांची नावे आहेत. त्यांनी गडाच्या दक्षिण बाजूस असलेल्या शीतकड्यावरून दरीत उडी मारली. दोघांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT