Dance Bar Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan: बारच्या नावाखाली वेगळाच प्रकार, तोकडे कपडे घालून अश्लील डान्स; पोलिसांनी सिनेस्टाईल छापा टाकला

Kalyan Bar Raid: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस एसीपी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बारमध्ये महिलांकडून अश्लील डान्स सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बारवर धाड टाकली.

Bhagyashree Kamble

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका बारमध्ये अश्लील डान्सचा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी बारमध्ये सुरू असलेल्या अश्लील प्रकाराचा पर्दाफाश केला. तसेच पोलिसांनी छापा टाकून ६ महिला सिंगरसह एकूण २३ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणानंतर कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे.

ही धाड पोलिसांकडून पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास टाकण्यात आली. नियमांच्या पूर्णपणे विरोधात, हा बार निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू होता. बारमध्ये महिलांकडून अश्लील कपडे घालून डान्स केला जात होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ही धडक कारवाई केली. झोन ३ आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने संयुक्त कारवाई करत बारवर छापा टाकला, आणि ६ महिला सिंगर, बार मालक, मॅनेजर, वेटर आणि ग्राहक अशा एकूण २३ जणांना ताब्यात घेतलं.

धाडी दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचासमक्ष पंचनामा करत २८,९८० रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. या कारवाईत बार मालक, मॅनेजर, वेटर, ग्राहक आणि महिला सिंगर अशा २३ जणांविरोधात कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर कल्याण-डोंबिवली परिसरात चर्चा सुरू झाली आहे की, पोलिस एसीपी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच जर नियम धाब्यावर बसवले जात असतील, तर पोलिसांचा धाक उरला आहे का? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. पुढील तपास महात्मा फुले पोलीस करत असून, या प्रकरणाने बार चालकांच्या बेधडक कारभारावर आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

SCROLL FOR NEXT