Kalyan Kid Mother Accident Case Sakal
मुंबई/पुणे

Kalyan Accident : लग्नानंतर १५ वर्षांनी मूल झालं, रस्ता ओलांडताना मायलेकाचा मृत्यू; हृदय पिळवटून टाकणारी घटना

Kalyan Accident Case : कल्याणच्या लालचौकी परिसरात काल सकाळी हा भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या एका तीन वर्षीय लहान मुलाला आणि त्याच्या आईला कचऱ्याच्या ट्रकने धडक मारली.

Yash Shirke

Kalyan Accident : कल्याणच्या लालचौकी परिसरामध्ये भीषण अपघात घडला आहे. यात एका ३ वर्षीय मुलासह आईचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्ता ओलांडताना कचऱ्याच्या ट्रकने दोघांना धडक दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, ते दोघे रस्त्याच्या दुभाजकावर उभे होते. दरम्यान कचऱ्याचा ट्रक वेगाने आला आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी लगेच गर्दी झाली. जमावाने दोघांनाही लगेच कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृत बालकाचे नाव अंश (वय ३) आणि त्याच्या आईचे नाव निशा सोमेश्वर (३९) असे आहे. लालचौकी परिसरामध्ये काल (८ जानेवारी) सकाळी ११ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडताना कचऱ्याच्या ट्रकच्या धडकेमुळे त्या दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातामध्ये जीव गमावलेल्या मुलाचे वडील (अमित सोमेश्वर) हे बंगळुरुमधील एका आयटी कंपनीमध्ये कामाला आहेत. अपघात होण्याच्या एका दिवसापूर्वी मंगळवारी (७ जानेवारी) ते कामासाठी बंगळुरुला रवाना झाले असल्याचे माहिती पोलिसांना कुटुंबियांना दिली. ते लगेच मुंबईसाठी रवाना झाले असल्याचेही सांगितले. सोमेश्वर दांपत्याला लग्नानंतर बाळ होत नव्हते. १५ वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्यांना मुलगा झाला होता, असे नातेवाईकांना पोलिसांना सांगितले.

अपघात झालेल्या ठिकाणी आधीपासूनच दुभाजक तुटलेला होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान कल्याणचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी मनसे कार्यकत्यांसह अपघाताच्या परिसरात आंदोलन केले. रस्त्याचे बांधकाम नीट न केल्याने, रस्त्याची देखभाल न झाल्याने हा प्रसंग घडला असे त्यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT