Car And Bike Accident On Nagar-Kalyan Highway Saam Tv
मुंबई/पुणे

Junnar Accident : कल्याण-नगर महामार्गावर भयानक अपघात, भरधाव कारची दुचाकीला धडक, पती-पत्नी १० फूट हवेत उडाले, थरारक VIDEO

Car And Bike Accident On Nagar-Kalyan Highway: नगर -कल्याण महामार्गावर पिंपरी पेंढार येथे अपघाताची ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रोहिदास गाडगे

अहमदनगर- कल्याण महामार्गावर (kalyan -nagar highway) शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच या महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना धडक दिली. या अपघातामध्ये दोघेही १० फुटांपर्यंत हवेत उडाले. हा भीषण अपघात सीसीटीव्ही (CCTV) कैद झाला आहे. सुदैवाने अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर -कल्याण महामार्गावर पिंपरी पेंढार येथे अपघाताची ही घटना घडली आहे. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. रस्ता ओलांडत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. कारच्या धडकेनंतर दुचाकीवरील दोघेही फुलबॉलप्रमाणे हवेत १० फुटांपर्यंत उंच उडाले. दुचाकीवरून जाणारे पती-पत्नी अक्षरश: दूरपर्यंत फेकले गेले.

हा भीषण अपघात रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघेही थोडक्यात बचावले. पण ते जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघताचा तपास जुन्नरच्या आळेफाटा पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, शुक्रवारी कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने अंत्यविधीवरून परतणाऱ्या नागरिकांना चिरडले. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी झाले होते. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुचवाडी येथे हा अपघात झाला होता. जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday June 2026: महत्त्वाची बातमी! जून महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, तारखा आताच नोट करा

Vaibhav Sooryavanshi: जिंकली आरसीबी, हवा मात्र वैभवची; मिळाले 5 अवॉर्ड्स, लाखो रूपये आणि नवी कोरी कार

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Saphale Fort : पाऊस अन् ट्रेकिंग, वीकेंडला करा सफाळेजवळील 'या' किल्ल्याची सफर

Mumbai-Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू; मिसिंग लिंकवर वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT