Vallabh Benke Death Saam tv
मुंबई/पुणे

Vallabh Benke Death : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन, पंचक्रोशीवर शोककळा

Vallabh Benke Death : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन झालं आहे. जुन्नरचे वल्लभ बेनके हे आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

रोहिदास गाडगे

Vallabh Benke Death News :

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन झालं आहे. जुन्नरचे वल्लभ बेनके हे आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज रविवारी वल्लभ बेनके यांची प्राणज्योत मालवली. वल्लभ बेनके यांच्या निधनाने जुन्नर परिसरात शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांची निधनाने कार्यकर्त्यांच्या शोककळा पसरली आहे. स्पष्ट वक्तेपणा,धडाकेबाज नेता अशी वल्लभ बेनके यांची ओळख होती. शरद पवारांचे सहकारी म्हणूनही वल्लभ बेनकेंनी काम केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार,कृष्णा खोरे महामंडळ अशा विविध पदावर बेनकेंनी काम केलं. एक महिन्यापूर्वी शरद पवार यांनी जुन्नर दौऱ्यावर असताना वल्लभ बेनकेंची भेट घेतली होती.

वल्लभ बेनके यांची राजकीय कारकिर्द कशी होती?

वल्लभ बेनकेंचा जन्म २३ जून १९५० रोजी हिवरे बुद्रूक या छोट्याशा गावात झाला. त्यांचा शेती प्रमुख व्यवसाय होता. कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा, मुत्सद्दी नेता अशी बेनके यांची ओळख आहे. बेनके हे शरद पवारांच्या विश्वासातील नेते होते. प्रशासनावरही त्यांची चांगली पकड होती. आजारपणामुळे मागील काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते.

धरणग्रस्तांच्या प्रश्‍नासाठी ते विविध आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता. या धरणग्रस्तांच्या आंदोलनातूनच त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाकामासाठी अनेक प्रकल्प दरबारातून मंजूर करून घेतले होते. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील देवस्थानांचा विकास करण्यासाठीही निधी मिळवून दिला होता. त्यांनी नारायणगाव येथे टोमॅटोचे खरेदी विक्री बाजार केंद्र सुरू केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT