J. J. Hospital Subway News Saam TV
मुंबई/पुणे

J. J. Hospital Subway News: जे.जे. रुग्णालायत सापडलं १३० वर्षांपूर्वीचं भुयार; 'असा' लागला भुयारी मार्गाचा शोध

J. J. Hospital Subway News: ब्रिटीशांच्या काळात बांधले गेलेले भुयार आता १३० वर्षांनी जगासमोर आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर, मुंबई

J. J. Hospital Latest News: मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील जे. जे. शासकीय रुग्णालयातच सुमारे १३० वर्षे जुना भुयारी मार्ग (Subway) सापडला आहे. ब्रिटीशांच्या काळात बांधले गेलेले भुयार आता १३० वर्षांनी जगासमोर आले आहे.

जे. जे. रुग्णालय परिसरातील (JJ Hospital) डी. एम. पेटिट या १३० वर्षे जुन्या असलेल्या इमारतीत हे भुयार सापडले आहे. या ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय असून, भुयार सापडल्याने रुग्णालय परिसरातील कर्मचाऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या भुयाराची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आली आहे. (Mumbai Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालय परिसराची नियमित पाहणी करणारे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण राठोड हे बुधवारी रुग्णालयाची पाहणी करत होते. यावेळी त्यांना सध्या ज्या ठिकणी नर्सिंग कॉलेज आहे तिथे काही तरी असल्याचा संशय आला. त्यांनी त्यावरील झाकण उघडून पाहिले तर लांबलचक पोकळी असलेला भाग दिसला. कुतूहल म्हणून त्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावून आणखी पाहणी केली असता हे भुयार सापडलं. (Breaking Marathi News)

जेजे रुग्णालयातील हे भुयार ब्रिटीशकालीन आहे. ही भुयार १३० वर्ष जुनी आहे. याबाबत जेजे रुग्णालयाकडून आर्किओलॉजी डिपार्टमेंटला आणि स्थानिक प्रशासनाला कळवण्यात येणार आहे. हे भुयार डिलिव्हरी वॉर्ड ते चिल्ड्रेन वॉर्ड असल्याची रुग्णालयाची माहिती देण्यात आली आहे. मात्र, हे भुयार आणखी मोठे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (JJ Hospital Subway News)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT