Jitendra Awhad  Saam TV
मुंबई/पुणे

बीडीडी चाळीतील निवृत्त पोलिसांना फुकटात घरे मिळणार नाहीत : जितेंद्र आव्हाड

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बीडीडी चाळीत मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी (Police) आणि मुंबईकर राहतात. आज याच चाळीबाबत महत्वाची बैठक पार पडली. 'बीडीडी चाळीतील प्रत्येक घराचा बांधकाम खर्च हा अंदाजे १ कोटी १५ लाखांपर्यंत इतका आहे. पण म्हाडाने येथे असलेल्या २२५० पोलीस कर्मचाऱ्यांना तोटा सहन करून ५० लाख रुपयांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतला आहे,अशी महत्वपूर्ण माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. या बैठकीत वरळीचे आजी माजी आमदार उपस्थित होते. (Jitendra Awhad Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

आव्हाड यांनी सांगितले की, बीडीडी चाळीमध्ये जे निवृत्त पोलीस कर्मचारी अनेक वर्षांपासून राहत आहेत. त्यांना घरे दिली जातील. या चाळीतील प्रत्येक घराचा बांधकाम खर्च हा १ कोटी रुपये आहे. आतापर्यंत २२०० पोलीस कर्मचाऱ्यांना घरे देण्यात आली आहेत. माणुसकीच्या दृष्टीने चाळीत राहणाऱ्यांना घरे देण्यात येतील. ही घरे पन्नास लाखांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर इमारत तयार होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. २२५० पोलीस निवृत्त होणार आहेत, त्यांना ही घरे देण्यात येईल. सगळ्यांना मोफत घरे मिळणार नाहीत. या घरासाठी १ कोटी पाच लाख ते पन्नास लाख रुपये मोजावे लागणार आहे'.

पुढे आव्हाड म्हणाले, 'हा निर्णय करारपत्रात नमूद करून करारपत्र त्वरीत दिली जातील. या निमित्ताने सर्व काम मार्गी लागलेलं आहे. तेव्हा आता निवृत्त पोलिसांनी लवकरात लवकर आपली घरे खाली करावी'. आव्हाडांच्या विनंतीनंतर निवृत्त पोलिसांना लवकरात लवकर घरे रिकामी करावी लागणार आहे. 'गिरणी कामगारांना वीस वर्षात सोळा हजार घर दिली. त्यामुळं गिरणी कामगार आणि पोलीस कर्मचारी अशी तुलना होऊ शकत नाही. या पोलीस क्वॉटर्स होत्या. त्यामुळे अशी घरं दिली तर पोलीसांना द्यायला घरं उरणार नाहीत.सदर निर्णय हा धोरणात्मक निर्णय नाही. वरळी पुरता हा निर्णय आहे. तसेच फुकटात घरे मिळणार नाही. त्यामुळं पन्नास लाख किंमत द्यावीच लागणार, असेही आव्हाड यांनी सांगितले. आत्ताच्या घरावर त्यांचा मालकी हक्क नाही. पोलीस कर्मचारी फार छोट्या घरात राहून सेवा बजावत असतात. मुंबईत घर असावे अनेकांचं स्वप्न असते. त्यामुळं त्यांनाही आपलं घर असावं अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, या घरांसाठी त्यांना पैसे मोजावे लागणार आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Road Accident: भयंकर! भरधाव बस दगड भरलेल्या डंपरमध्ये घुसली, ९ जण ठार; जेसीबीने पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर

Mumbai Indians: रोहित शर्मा पलटणची साथ सोडणार? मुंबई इंडियन्स या खेळाडूंना करणार रिटेन

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणी टाळ मृदुंगाच्या निनाद आणि भक्तीरसात तल्लीन

Sugar Apple : सिताफळ आईस्क्रिम कशी बनवतात माहितीये?

Nandurbar Politics : भाजप नेते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; माजी मंत्री वळवी निवडणूक लढवण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT