NCP Saam TV
मुंबई/पुणे

जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा माझ्याकडे दिलाय; कारवाई सूडबुद्धीने, पोलिसांच्या भूमिकेवर जयंत पाटलांचा सवाल

माझा राज्य सरकार आणि पोलिसांना प्रश्न आहे की काल झालेली घटना ही 354 मध्ये कुठे बसते हे दाखवून द्या, असा सवाल जयंत पाटलांनी विचारला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awhad)  यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आव्हाडांच्या भूमिकेनंतर त्यांचं मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी बोलताना जयंत पाटलांना काही प्रश्न उपस्थित केले. माझा राज्य सरकार आणि पोलिसांना प्रश्न आहे की काल झालेली घटना ही 354 मध्ये कुठे बसते हे दाखवून द्या, असा सवाल जयंत पाटलांनी विचारला. (Politics)

महाराष्ट्र पोलीस आणि ठाणे पोलिसांनी हे प्रकरण या गुन्ह्यात कसं बसवलं. कायद्याची मोडतोड कशी होते. गृहमंत्र्यांनी नेमकं काय सुरू आहे, ते बघावं. मुख्यमंत्री गाडीत असताना, पोलीस अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त असताना विनयभंग कसा होईल? मनात राग ठेऊन सरकारने ही कृती केली. त्या महिलेने मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली. त्यानंतर रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. यावरुन मुख्यमंत्री विरुद्ध जितेंद्र आव्हाड असं चित्र निर्माण होत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं.

सरकार आणि पोलिसांनी केलेल्या कृतीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आव्हाड राजीनामा घेऊन शरद पवार यांच्याकडे निघाले होते, मात्र तो राजीनामा मी माझ्याकडे घेतला आहे. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा झाली आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

354 आणि 376 साठी मी जन्माला आलेलो नाही- जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड आपल्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याबाबत भावूक झाले. माझ्यावर कोणताही लावला असता तर चाललं असत पण 354 मला मान्य नाही. मी आयुष्यात असं काही करू शकत नाही. समाजात माझी मान खाली जाईल असा गुन्हा माझ्यावर टाकला जातोय. हा कटाचा भाग आहे.

खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांविरोधात कारवाई व्हायला हवी. 354 चा गुन्हा दाखल झाल्यावर माझ्या मुलीला अनेकांनी प्रश्न विचारले. 354 आणि 376 साठी मी जन्माला आलेलो नाही. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण होऊ नये, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT