राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी

राज्यात राष्ट्रपती राजवट हा एक पर्याय असू शकतो.
supriya sule
supriya sulesaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : राज्यातील वातावरण अस्थिर झालं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारमध्ये एकमत नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट हा एक पर्याय असू शकतो. किंवा निवडणुका घेणे हा चांगला पर्याय असू शकतो, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. (Pune News)

जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये

जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, जितेंद्र आव्हाड याचं विधानसभेतील काम चांगलं आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये, पक्ष त्यांच्या नेहमी पाठीशी आहे.

supriya sule
Pune : पीएमपी चालकाला मारहाण; पुणे स्टेशन परिसरातील घटना

मुख्यंत्र्यांसमोर आणि बंदोबस्तात असलेल्या इतर पोलिसांसमोर जितेंद्र आव्हाड यांनी त्या महिलेला इथे गर्दीत कशाला आली, असं म्हणत हाताने बाजूला सारलं. हा काही विनयभंग आहे का? आव्हाड यांच्या विरोधात खोटा आणि चुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

supriya sule
Ratnagiri News : भोस्ते नदीवरील पूल झाला कमकुवत; प्रशासनाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

संजय राठोड प्रकरणाची झाली पाहिजे

संजय राठोड प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हायला हवी. संजय राठोड प्रकरण खूप नाजूक आहे. मी पूर्वी पण म्हणत होती की जर त्या मुलीवर अन्याय झाला असेल तर त्याची पारदर्शक चौकशी करण्यात यावी. संजय राठोडांवर पूर्वी पण आरोप केले नव्हते. आता विरोधक असूनही आरोप करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com