मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आव्हाड यांनी आज, १४ नोव्हेंबरला सकाळी एक ट्विट केलं. या ट्विटमधून त्यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. आव्हाडांच्या या घोषणेनं राजकीय वर्तुळात (Politics) खळबळ उडाली आहे. माझ्या विरोधात पोलिसांनी गेल्या ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ऋता आव्हाड यांचे ट्विट
रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात.आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही असे ऋता आव्हाड यांनी म्हंटल आहे.
तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील. ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत असा देखील आरोप ऋता आव्हाड यांनी केला आहे.
रविवारी, 13 नोव्हेबंर 2022 रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. याच कार्यक्रमात आव्हाडांविरोधात तक्रार करणारी महिलाही उपस्थित होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा तक्रारदार महिलेनं केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.